एक योग गुरू असलेले बाबा रामदेव यांच्या मध्ये खूपच ऊर्जा आहे त्यांचे वय भरपूर असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर ते दिसत नाही. त्यांच्या शरीरातील उर्जेमुळे ते अजूनही तरुण व्यक्ती सारखेच चालतात आणि पळतात सुद्धा. रामदेव बाबा हे दररोज तीन ते चार तास व्यायाम व योगासने करतात ते सांगतात की मी आजपर्यंत दवाखान्यामध्ये गेलेलो नाही. ते पतंजली द्वारे आपल्या स्वदेशी ब्रँड विषयी माहिती सांगत असतात.

रामदेव बाबा एखाद्या सेलिब्रिटी पेक्षा कमी नाहीत. रामदेव बाबांना बॉलिवूडच्या अनेक शोमध्ये जावे लागते. रामदेव बाबा सोनी वाहिनीवरील द कपिल शर्मा शो मध्ये देखील गेले होते. यामध्ये रामदेव बाबांनी कपिल शर्माला खुपच दमून टाकले होते शोमध्ये स्टेजवरच त्यांनी कपिला योगासनाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. बाबांची या वयात देखील असलेली एनर्जी पाहून सर्वजण थक्क होऊन गेले होते.

बाबा आपल्या योगामुळे संपूर्ण जगभरामध्ये लोकप्रिय झाले आहेत. चित्रपटांमध्ये मोठ-मोठ्या गुंडांना मारणारे अभिनेते देखील बाबांपुढे चितपट होऊन जातात. एकदा शिल्पा शेट्टीचा एका कार्यक्रमामध्ये बाबा रामदेव पोहोचले होते तुम्हाला हे तर माहीतच असेल की शिल्पा शेट्टी देखील व्यायाम तसेच योगासन करत असते. परंतु बाबा रामदेव च्या उर्जे पुढे शिल्पा शेट्टी देखील हरली होती. बाबांना तिने चक्क लोटांगण घेऊन दंडवत घातले होते.

बॉलीवूड चे खूपच दर्जेदार कलाकार रणवीर सिंग जेव्हा बाबांसोबत एका कार्यक्रमाच्या स्टेजवर होते तेव्हा बाबांनी रणवीर सिंग ला आपल्या खांद्यावर घेऊन संपूर्ण स्टेजवर मिळवले होते. रणवीर सिंग ने देखील बाबांपुढे हात जोडले होते.

बाबा अनेक कलाकारांबरोबर योगासने केली आहेत सुनील शेट्टी सोबत देखील बाबांनी योगासन केले आहे तर, रणवीर कपूर सोबत बाबांनी फुटबॉल देखील खेळला होता.

Post a Comment

Previous Post Next Post