ज्यांनी महाभारत पाहिले असेल किंवा ज्यांना महाभारत माहिती असेल त्यांना हे माहितीच असेल की मामा शकुनी हा कसा होता. शकुनीमामा हा खूपच क्रूर स्वभावाचा होता. मुळात सांगायचे झाले तर शकुनीमामा हे असे पात्र होते जे कुणालाही आवडत नसेल. शकूनी खूपच चतुर होता तसेच कपटी देखील होता त्याने पांडवांना वनवासाला पाठवले होते.

ह्या शकुनीमामा मुळेच पांडवांना द्रोपती ला खेळाच्या डावावर मांडावे लागले होते. मामा शकुनी मुळेच पांडवांचे संपूर्ण आयुष्य खूपच त्रासदायक बनले होते. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का कि शकुनीमामा हा कौरवांचा देखील द्वेष करत होता. कौरवा मधील शकुनीमामा अशा व्यक्तीचा द्वेष करत होता जो पांडवांना खूपच प्रिय होता.

पांडवांना खूपच प्रिय असलेल्या भीष्मपितामह यांचा द्वेष शकुनीमामा करत होता. आणि त्यांचा बदला घेण्यासाठी शकुनीमामा ने पांडवांना खूपच त्रास दिला होता. शकूनी हा राजा सुबला यांच्या शंभर पुत्रांपैकी सर्वात लहान पुत्र होता. शकूनी गांधार वंशा मधील राजकुमार होते. शकुनीला एकुलती एक बहिण होती जिचे नाव गांधारी असे होते. असे सांगितले जाते की महाभारताचे युद्ध शकुनि मुळेच झाले होते.

भीष्मपितामह यांचा का द्वेष करत होता मामा शकुनि :-

मामा शकुनी यांची बहीण गांधारीला धृतराष्ट्र सोबत जबरदस्तीने विवाह करावा लागत होता. धृतराष्ट्र हे जन्मतः आंधळे होते त्यामुळे आपल्या पतीला साथ देण्यासाठी गांधारीने ही जन्म आंधळे राहण्याचे वचन घेतले आणि डोळ्याला पट्टी बांधून घेतली. ह्या गोष्टीमुळे शकुनी खूपच नाराज झाला होता भीष्म तेथे असताना भीष्मपितामह आणि त्यांचे वडील यांना हा विवाह मोडला नाही तेथे शकूनी या विवाहाचा खूपच विरुद्ध होता.

शकूनी मामा यांना निरंतर असे वाटत होते की भीष्म पितामहा मुळे आपल्या बहिणीला एका अंध व्यक्ती सोबत लग्न करावे लागले त्यामुळे शकुनीमामा भीष्मपितामह यांचा नेहमी द्वेष करत असत.

Post a Comment

Previous Post Next Post