बॉलिवूड चित्रपटात विलन म्हणजेच खलनायक खूपच महत्त्वाचे असतात. ज्याप्रमाणे चित्रपटांमध्ये अभिनेत्याची म्हणजेच नायकाची गरज असते त्याचप्रमाणे चित्रपटांमध्ये खलनायकाची सुद्धा खूप गरज असते. खलनायक नसेल तर चित्रपट पाहताना अजिबात मजा येत नाही. असेच एक बॉलीवुड मधील खलनायक आहेत ज्यांना त्यांचे वडील IAS ऑफिसर बनवणार होते परंतु हे बनले चित्रपटात अभिनेत्रीची इज्जत लुटणारे खलनायक.

प्रेम चोप्रा हे हिंदी चित्रपट सुट्टीतील खूपच मोठे खलनायक होते. त्यांनी त्यांच्या खलनायकाच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवुडमध्ये खूपच नाव कमावले आहे. प्रेम चोप्रा यांचा अभिनय हा इतका जबरदस्त असतो की त्यांची एक्टिंग पाहून त्यांच्याबद्दल मनामध्ये गुणा निर्माण होत असते. यावरून तुम्हाला समजले असेल की प्रेम चोप्रा हे खलनायकाच्या भूमिकेसाठी कसे असेल.

प्रेम चोप्रा यांचा जन्म 23 सप्टेंबर 1935 मध्ये लाहोर येथे झाला होता. हा काळ तेव्हाचा होता जेव्हा भारताची विभागणी झाली नव्हती. विभागणी नंतर प्रेम चोप्रा आणि त्यांचा परिवार हा शिमल्याला शिफ्ट झाला. शिमला मध्येच प्रेम चोप्रा यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. त्यांच्या वडिलांना असे वाटत होते की आपल्या मुलाने IAS ऑफिसर व्हावे.

प्रेम चोप्रा यांचे वडील सरकारी कर्मचारी होते त्यामुळे त्यांचे ट्रान्सफर म्हणजेच बदली होणे सुरूच होते. प्रेम चोप्रा आपल्या कॉलेजच्या काळामध्ये कॉलेजमधील ड्रामा शो मध्ये भाग घेत होते. प्रेम चोप्रा यांच्या वडिलांना असे वाटत होते की प्रेमने अगोदर आपले शिक्षण पूर्ण करावे आणि नंतरच मुंबईला जावे त्यानंतर प्रेम चोप्रा यांच्या आईचे निधन झाले.

प्रेम चोप्रा यांच्या पत्नीचे नाव उमा चोप्रा असे आहे त्यांना तीन मुली आहेत ज्यांची नावे रकिता, पूनिता आणि प्रेरणा असे आहे.

Post a Comment

Previous Post Next Post