तब्बू बॉलीवूड मधील खूपच प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तब्बू आता सत्तेचाळीस वर्षाची झाली असून तिने अतिशय कमी वयापासूनच अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. तसेच तिने बॉलिवुडच्या अनेक दिग्गजांबरोबर काम केले आहे. परंतु हे तुम्हाला माहिती आहे का की अजूनही तब्बूचे लग्न केलेले नाही. तब्बू दिसायला खूपच सुंदर आहे तिने अनेक चित्रपटांमध्ये खूपच सुंदर अभिनय साकारला आहे.

असे सांगितले जाते की तब्बू एका साउथ अभिनेत्याची दिवानी झाली होती. तर आजच्या या लेखातून आपण तब्बू चा अशा एका लव्हस्टोरी विषयी जाणून घेणार आहोत ज्यामुळे तब्बूची भरपूर चर्चा झाली होती.

तब्बूला साउथ ॲक्टर तसेच साऊथचा सुपरस्टार नागार्जुन सोबत प्रेम झाले होते. अशा देखील बातम्या येत होत्या की नागार्जुन आणि तब्बू ने जवळपास पंधरा वर्ष एकमेकांना डेट केले. दोघांचे एकमेकांवर खूपच प्रेम होते. प्रत्येक ठिकाणी ते दोघे एकत्र दिसत असे. एवढेच नाहीतर तब्बू ने नागार्जुन मुळे हैदराबाद मध्ये एक आलिशान घर देखील घेतले होते.

हैदराबाद मध्येच नागार्जुन राहात होते, मीडियाकडून असे सांगण्यात येते की नागार्जुन आधीपासूनच विवाहित होते आणि ते आपल्या पहिल्या पत्नीपासून तलाक सुद्धा घेऊ इच्छित नव्हते. त्यामुळे दोघांच्या लव्हस्टोरीचा इथेच द एन्ड झाला होता. त्यानंतर तब्बू आणि नागार्जुन चा ब्रेकअप 2012 मध्ये झाला होता.

अजूनही सुंदर दिसणारी तब्बू अविवाहितच आहे. तिने अजूनही कुणाशीच लग्न केलेले नाही. तिने बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यां बरोबर चित्रपटात रोमान्स केला आहे. त्यामुळेदेखील तिची खूपच चर्चा देखील झाली होती.

Post a Comment

Previous Post Next Post