जगामध्ये निरनिराळ्या गोष्टी घडत असतात ज्यामुळे आपण हैराण होऊन जात असतो. अशीच एक हैराण करणारी गोष्ट घडली आहे तेलंगणामध्ये. तेलंगणात एक अशी घटना समोर आली आहे की एका महिला ने 11 वर्षात एकानंतर एक असे आठ नागरिकांशी विवाह केला आहे. विवाह केल्यानंतर तिने त्यांचा विश्वास संपादित केला आणि त्यानंतर या महिलेने त्या व्यक्ती कडील असलेले पैसे सोने-नाणे घेऊन पसार झाली. या महिलाचे नाव आहे मोनिका मलिक.

ही घटना घडली आहे किशोर नामक व्यक्तीसोबत.. एका वर्षा आधी किशोर यांच्या पत्नीचा देहांत झाला होता त्यानंतर त्यांनी मोनिका या महिलेसोबत लग्न केले. महिला त्यांच्यापासून पंचवीस वर्षांनी लहान होती. या महीलाने किशोर यांच्याशी वैवाहिक साईट द्वारे संपर्क साधला होता.

परंतु लग्नाच्या दोन महिन्यानंतर जेव्हा किशोर सकाळी झोपेतून उठला तेव्हा आपल्या घराचा अवतार बघून हैराण झाले. त्याच्या घरातील सर्व महागड्या वस्तू, महागडे दागिने आणि पैसे घेऊन त्याची पत्नी पसार झाली होती.

मोनिका सर्व सोने-नाणे आणि 15 लाख रुपये कॅश घेऊन फरार झाली होती. तिला सीसीटीव्ही कॅमेरा द्वारे शोधण्यात आले. किशोरने त्यानंतर दिल्लीमध्ये असलेल्या मेट्रोमनी साईटच्या एजन्सी वर संपर्क केला तर तिथून त्याला मोनिकाच्या अगोदरच्या पतीची माहिती मिळाली. त्या सोबतही असाच प्रकार घडला होता.

या सर्व घटनेचा तपास केला असता असा प्रकार समोर आला की मोनिका नामक महिलेने गेल्या अकरा वर्षांत आठ नागरिकांसोबत असा खेळ खेळला होता. काही दिवस ती त्यांचा विश्वास संपादन करत असे आणि नंतर त्यांचे सोने पैसे घेऊन फरार होत असे. त्यानंतर तेलंगणा पोलिसांनी मोनिकाला अटक केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post