आजच्या काळामध्ये अशा बातम्या समोर येत असतात ज्या ऐकून आपण हैरान होऊन जातो. अशातच एक हैराण करून सोडणारी बातमी हैदराबाद मधून समोर येत आहे. येथील एका युवतीने तांदळाच्या दाण्यावर श्रीमद्भागवत गीता लिहिली आहे. ह्या मुलीने 4042 तांदळाच्या दाण्यावर श्रीमद्भागवत गीता लिहून टाकली आहे.

असे सांगितले जाते की हे कार्य करण्यासाठी या मुलीला 150 तास वेळ लागला होता, आणि तिच्या दोन हजार कलाकृतींच्या संग्रहामध्ये आणखी एक अद्भुत काम जोडले गेले आहे. ह्या युतीचे नाव रामगिरी स्वरीका आहे ही देशातील पहिली मायक्रो आर्टिस्ट महिला असल्याचा दावा करते आहे.

स्वारिकाने असे सांगितले की, मी 4042 तांदळाच्या दाण्यावर श्रीमद् भागवत गीता लिहिली आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी मला 150 तास लागले आहे. मी मायक्रो आर्ट बनवण्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंवर काम करत असते. तिने असे देखील सांगितले की ती मिल्क आर्ट, पेपर कार्विंग आणि अन्य उत्पादनांवर आपली कलाकारी दाखवली आहे.

काही दिवसांपूर्वी स्वरीकाने हेअर स्ट्रेंड्स वर संविधानाची प्रस्तावना लिहिली होती आणि यासाठी तिला तेलंगणा चा गवर्नर तमिलीसाई सौंदराराजन यांनी सन्मानित देखील केले होते. राष्ट्रीय स्तरावर. तिला तिच्या कामाची ओळख मिळू लागली आहे आता स्वरिकाची अशी इच्छा आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव झळकावे.

स्वरीका ने 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑर्डर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपले नाव नोंदवले होते. त्यानंतर 2019 मध्ये दिल्ली सांस्कृतिक अकादमी कडून तिला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. केवळ एवढेच नव्हे तर भारताची पहिली मायक्रो आर्टिस्ट म्हणून देखील तिला मान्यता मिळाली होती. स्वरीका ही लॉ ची विद्यार्थिनी आहे व ती पुढील आयुष्यामध्ये एक जज बनू इच्छिते व बऱ्याच महिलांसाठी एक प्रेरणास्रोत बनू इच्छिते.

Post a Comment

Previous Post Next Post