विनोद खन्ना यांना बॉलिवूडमधील एक हँडसम ॲक्टर म्हणून ओळखले जाते. त्यांनी बॉलिवूडमधील दीडशेपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. चित्रपटात खूपच हँडसम व सुंदर दिसणाऱ्या विनोद खन्ना यांच्यावर बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री फिदा होत होत्या.

या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे सैफ अली खान यांची पहिली पत्नी अमृता सिंग. हो हे वाचून हैराण झाला असाल परंतु अमृता सिंग विनोद खन्ना यांच्यासाठी वेडी झाली होती. एवढेच नाही तर विनोद खन्ना यांच्यासोबत अफेयर सुरू करण्यासाठी तिने पैज देखील लावली होती. ह्या पैजे मुळे काय झाले होते हे या आजच्या लेखातून पाहणार आहोत.

रवी शास्त्री यांच्या बरोबर लावली होती पैज :- विनोद खन्ना यांनी चित्रपट सृष्टीच्या ऐंशीच्या दशकामध्ये चित्रपट सुट्टीला अलविदा म्हटले होते. यादरम्यान ते एका संन्यासा प्रमाणे जीवन जगत होते. परंतु 1987 झाली त्यांनी बॉलिवुडमध्ये पुन्हा एकदा धूम उडवून दिली होती. या दरम्यानच विनोद खन्ना यांनी अमृतासिंग बरोबर एक चित्रपट साईन केला होता.

त्यावेळी अमृता ही क्रिकेटर रवी शास्त्री यांच्या सोबत डेट करत होती. परंतु अमृता ही विनोद खन्ना यांच्या स्टाईल वर फिदा झाली होती. या दरम्यानच एकदा अमृता सिंह रवी शास्त्री यांच्यासमोर चेष्टा करताना असे म्हटले होते की लवकरच माझे अफेयर हे विनोद खन्ना यांच्यासोबत सुरू होणार आहे. त्यामुळे रवी शास्त्री खूपच नाराज झाले त्यांनी अमृताला म्हटले की तू विनोद खन्ना यांच्यासोबत अफेअर करू शकत नाही. यामुळे अमृता सिंग ने रवी शास्त्री ला चॅलेंज दिले होते.

हळूहळू अमृता व विनोद खन्ना यांच्यामध्ये प्रेम होऊ लागले. दोघे बऱ्याच ठिकाणी एकत्र पाहिले गेले होते. परंतु या विषयी अमृता सिंग यांची आई रुकसाना सुलतान यांना माहिती मिळाली त्यांनी अमृताला असे बजावून ठेवले की विनोद खन्ना त्यांच्यापासून दूर राहण्यास सांगितले. काही काळानंतर अमृतासिंग आपल्यापेक्षा नऊ वर्षांनी लहान असलेल्या सैफ अली खानबरोबर लग्न करून टाकले.

Post a Comment

Previous Post Next Post