मित्रांनो प्रत्येक व्यक्ती हा दररोज पाण्याने अंघोळ करत असतो. कारण आपल्या त्वचेची साफसफाई ठेवण्यासाठी अंघोळ करणे गरजेचे असते. जर आंघोळ केली नाही तर दिवसभर आपण थोडेसे विचित्रच दिसत असतो. एखाद्या वेळी आजारी पडल्यावर आपण आंघोळ करत नाही त्यावेळी आपल्यालाही आत मधून थोडेसे वेगळेच वाटत असते. सांगायचे झाले तर आपल्याला आंघोळीची रोज सवय लागलेली असते.

अनेक लोक आंघोळ करत असतात तेव्हा गरम पाणी घेत असतात, परंतु शरीरासाठी गरम पाणी हानिकारक असते. त्यामुळे शक्यतो थंड पाण्याने अंघोळ करावी. जर थंड पाण्याने अंघोळ करणे शक्य होत नसेल तर थोडेसे कोमट पाणी करून मग आंघोळ करावी. त्वचेसाठी अति गरम पाणी खुपच हानिकारक असते.

आंघोळीसाठी जर तुम्ही पाणी बादली मध्ये ओतून घेतले आणि त्यामध्ये थोडेसे चमचाभर मीठ टाकले तर याचे अनेक फायदे मिळू शकतात. हे फायदे काय आहेत हे आम्ही तुम्हाला आजच्या या लेखाद्वारे सांगणार आहोत.

अंघोळीच्या अगोदर बाटलीमध्ये चमचाभर मीठ टाकल्यास जे फायदे मिळतात ते जाणून घेतल्यास तुम्ही हैरान होऊन जाल. आंघोळीच्या पाण्यात मीठ टाकल्यास मिळणाऱ्या फायद्यांची लिस्ट तशी खूपच मोठी आहे परंतु याचा मुख्य फायदा असा आहे की, जर तुम्हाला त्वचा संबंधीचा कोणताही विकार असेल तर तो बरा होत असतो.

आंघोळीच्या पाण्यात थोडेसे मीठ टाकून मग त्या पाण्याने अंघोळ केल्यास तुमची खाज, नायटे, गजकर्ण यासारख्या अनेक त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते.

Post a Comment

Previous Post Next Post