
ह्यावर्षी नवरात्री महोत्सवाची सुरुवात 17 ऑक्टोंबर पासून सुरू होणार आहे. तर नवरात्री महोत्सवाची समाप्ती 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ह्या नऊ दिवसांमध्ये माता दुर्गा ची नऊ स्वरूपामध्ये उपासना केली जाते. नवरात्रातीत प्रत्येक दिवसाचे एक वेगळेच महत्त्व असते असे म्हटले जाते की नवरात्री मध्ये माता दुर्गा कैलास पर्वतावरून पृथ्वीवर येण्याचा प्रवास सुरू करत असते. यादरम्यान माता दुर्गा आपल्या विशेष वाहनावर स्वार होऊन येत असते.
दरवर्षी माता दुर्गा वेगवेगळ्या वाहनांवर स्वार होऊन पृथ्वीवर येत असते. माता दुर्गेचा प्रत्येक वाहन हे एक संकेत देत असते. माता दुर्गा पृथ्वीवर पालखी, नाव, हत्ती, किंवा घोड्यावर स्वार होऊन येत असते. असे मानले जाते की मातेच्या वाहनांवर भविष्यात घडणार्या घटनांचा संकेत मिळत असतो.
अशी मान्यता आहे की नवरात्रीची सुरुवात सोमवार किंवा रविवार पासून होत असेल तर माता दुर्गा हत्ती हे वाहन पृथ्वीवर येण्यासाठी निवडत असते. नवरात्री जर बुधवारपासून सुरू होत असेल तर माता दुर्गा नावे मध्ये स्वार होऊन येत असते.
गुरुवार आणि शुक्रवारच्या दिवशी जर नवरात्री महोत्सव सुरू झाला तर माता ही पालखीमधून येत असते. जर शनिवारी आणि मंगळवारी नवरात्रोत्सव सुरू झाला तर माता दुर्गा ही घोड्यावर स्वार होऊन पृथ्वीवर आपल्या भक्तजनांना आशीर्वाद देण्यासाठी येत असते.
ह्यावर्षी नवरात्री महोत्सव 17 ऑक्टोंबर म्हणजेच शनिवारी सुरू होणार आहे. त्यामुळे माता दुर्गा यावर्षी घोड्यावर स्वार होऊन भक्तजनांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तळावर येत आहे. घोडा हा युद्धाचे प्रतीक मानले जाते. घोड्यावर स्वार होऊन दुर्गामातेचे पृथ्वीवर येणे खूपच शुभ संकेत मानला जातो असे ज्योतिषाद्वारे सांगण्यात येते.
Post a comment