बेसन पिठाचा वापर आपण किचन मध्ये भरपूर प्रमाणात करत असतो. अनेक भाज्यांमध्ये बेसन पिठाचा वापर आपण करत असतो. जास्त प्रमाणात भजे करण्यासाठीच बेसन पिठाचा वापर केला जातो.

परंतु तुम्हाला माहिती आहे का की बेसन पिठाचा वापर हा. त्वचे संबंधित कामासाठी देखील करू शकतो. बेसन पिठाचा वापर आपण आपल्या आरोग्य संबंधित अनेक समस्यांवर देखील करू शकतो. आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत कि बेसन पीठाचे काय आहेत फायदे त्वचेसाठी बेसन पीठ कशा प्रकारे फायदेशीर ठरू शकते. सर्व जाणून घेऊया आजच्या या लेखामध्ये.

बेसन पिठाच्या द्वारे आपण त्वचेसाठी फेस पॅक बनवून वापरू शकतो. चला तर मग जाणून घेऊया बेसन पिठाचा फेस पॅक कसा बनवला जातो. ह्या फेसपॅक चा उपयोग केल्यास त्वचा संबंधीच्या सर्व अडचणी दूर होऊ शकतात.

बऱ्याचशा महिला ह्या आपला गळा व काखेची स्वच्छतेकडे लक्ष देत नाही. यामुळे तेथील भागाचा रंग हा काळपट पडत असतो. त्या जागेला साफ व गोरे ठेवण्यासाठी बेसन, दही आणि हळदी चा उपयोग करून शकतो.

यासाठी एका वाटीमध्ये बेसन दही व हळद एकत्र करून घ्यावे. हे मिक्सचर त्याजागी तीस मिनिटासाठी लावावे व त्यानंतर धुऊन टाकावे. हे केल्यानंतर त्या जागी तिळाच्या तेलाद्वारे मसाज करावी.

तुम्ही चेहऱ्यावर पुरळ, फोड येण्याच्या समस्येपासून परेशान आहात तर यासाठी बेसन पिठाचा हा सोपा उपाय तुम्ही करू शकता. चंदन पावडर हळद आणि दूध एकत्र करून याला चेहऱ्यावर वीस मिनिटासाठी लावावे. हे तुम्ही आठवड्यातून कमीत कमी तीनदा केल्यास चेहऱ्यावरील सर्व पुरळ फोड नाहीशे होतील.

Post a Comment

Previous Post Next Post