इच्छा असली की मार्ग सुचतो, हे तर आपल्याला माहीतच आहे. एखाद्या गोष्टीसाठी आपण निरंतर मेहनत करत राहिलो तर ती गोष्ट आपल्याला सर्वजण मिळून देण्याचा प्रयत्न करत असतात. ही गोष्ट ही ओळ खरी करून दाखवली आहे एका अशा घटनेने जी घडली आहे महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यांमधील छोट्याशा गावांमध्ये.

या गावात एक अशी घटना घडली की त्या महिलेचे पती मजुरीचे काम करत होते. ती महिलादेखील मजुरीचे काम करत होती. परंतु त्या महिलेच्या पतीने तिला शिकवले व पोलीस अधिकारी बनवले. ह्या महिलेचे नाव आहे पद्मशीला तिरपुडे.

पद्मशीला तिरपुडे यांनी आपल्या संघर्षाच्या काळात कधीही हार नाही मानली. पद्मशीला तिरपुडे सगळ्या महिलांसाठी एक प्रेरणास्रोत बनल्या आहेत. पद्मशीला यांनी आपल्या संघर्षाच्या काळामध्ये मजुरीचे काम केले, तसेच सोबतच शिक्षण देखील सुरू ठेवले आणि या संघर्षाचे एके दिवशी फळ मिळाले. महाराष्ट्र मध्ये घेतल्या जाणाऱ्या एमपीएससी'च्या परीक्षेमध्ये पास होऊन त्या पोलीस अधिकारी झाल्या होत्या.

काही दिवसांपूर्वी पद्मशीला तिरपुडे या एक साधारण स्त्री होत्या त्यांना कोणीही ओळखत नव्हते. दहा वर्षापूर्वी त्यांनी भंडारा जिल्ह्यातील वाकेश्वर या गावाशेजारील एका छोट्याशा गावांमधील तुकाराम खोब्रागडे यांच्या सोबत त्यांनी विवाह केला. सुरुवातीच्या काळी दोघे पती-पत्नी मजुरीचे काम करत असे व आपले पोट भरत असे.

एकेदिवशी पतीच्या मजुरीचे पन्नास रुपये हरवून गेले आणि त्या दिवशी त्यांच्या संपूर्ण कुटुंबा ला खूपच वाईट अनुभव आला होता. त्यानंतर त्यांनी असे ठरवले की आता अभ्यास करून काहीतरी बनवून दाखवायचे. त्यानंतर त्यांनी अगदी जीव तोडून अभ्यास केला. आणि एमपीएससीच्या परीक्षेमध्ये यश मिळवून दाखवले सलाम आहे अशा महिलेच्या कार्याला.

Post a Comment

Previous Post Next Post