कुशल अर्थशास्त्री व नीती शास्त्री म्हणून ओळखले जाणारे आचार्य चाणक्य यांनी जगाला खूपच सुंदर नीती शिकवली आहे. त्यांनी आपल्या नीतिशास्त्र शास्त्रामध्ये अशा परिस्थितींचा उल्लेख केला आहे ज्या परिस्थितीत मध्ये काही कारणामुळे व्यक्ती नेहमी दुःखी राहात असतो.

ते म्हणतात की मनुष्याला सुख प्राप्त करण्यासाठी काही गोष्टींमध्ये बदलाव केला पाहिजे. तर आज आम्ही चाणक्याच्या नीती विषयी बोलणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात...! कोणत्या आहेत चाणक्यांनी सांगितलेल्या ह्या नीती...!

कुग्रामवास : कुलहीन सेवा कुभोजन क्रोधमुखी च भार्या।

पुत्रश मुरखो विधवाच कन्या विनागनिमेते प्रदहती कायम।

चाणक्य अनुसार मनुष्याला अशा जागी नाही राहिले पाहिजे जी अगोदरपासूनच बदनाम आहे. अशा जागी राहणारे सर्वजण वाईटच असतात. लोक दुसऱ्यांसाठी चा कधीही चांगला विचार करत नसतात. त्यामुळे आपण तेथे राहिल्यास आपल्या होणाऱ्या संतान वर वाईट परिणाम पडू शकतो. तसेच अनेक प्रकारची हानी होण्याची देखील शक्यता असते.

चाणक्य असे सांगतात की चुकीचे काम करणाऱ्या लोकांची मदत कधीही करू नये. अशा लोकांची मदत करण्याला चाणक्य अधर्म मानतात. ते सांगतात की चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीची साथ देणे म्हणजे आयुष्य बरबाद करून घेणे आहे. चांगला खूपच चांगला मनुष्य जरी असला तरी अशा लोकांच्या संगतीमुळे त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून जात असते. त्यामुळे अशा लोकांच्या संगतीत कधीही राहू नये.

चाणक्य असे सांगतात की व्यक्तीने तेवढेच भोजन ग्रहण करावे जेवढी त्याची जरुरत आहे. अधिक भोजन केल्यास शरीरासाठी हानिकारक असते. तसेच जे भोजन तुम्ही करणार आहात ते चांगले असायला हवे. जर भोजन हे सात्विक नसेल तर मनुष्य चुकीचे कामे करू लागतो.

Post a Comment

Previous Post Next Post