अनेकदा तुम्ही कोर्टामध्ये गेला असाल किंवा टीव्हीमध्ये कोर्ट संबंधित काही पाहिले असेल तर तेथे असलेले सर्व वकील हे काळ्या रंगाच्या कोट परिधान करून वावरताना दिसत असतात.
अनेकदा आपल्याला असा प्रश्न पडत असतो की एवढ्या रंगाचे कोट आहेत परंतु नेहमी वकील लोक हे काळया रंगाचे कोट का परिधान करत असतील.
याचे उत्तर आज आम्ही आजच्या या लेखाद्वारे देणार आहोत. भारताची न्यायव्यवस्था खूपच मोठी आहे. येथे हजारो कोर्ट उभी आहेत. जेणेकरून लोकांना त्यांचा न्याय मिळेल यासाठी अनेक वकील देखील असतात.
न्यायालयातील कोणतेही कामकाज असो कामकाजा दरम्यान वकील नेहमी काळ्या रंगाच्या कोट मध्ये दिसत असतात. हे कामकाज हे कधीही असो, कोणताही ऋतू असो अगदी उन्हाळ्यात देखील वकील लोक हे काळ्या रंगाच्या कोट मध्ये येत असतात.
तुम्हाला हे माहिती नसेल परंतु इंग्रजांच्या काळापासून चालत आलेली ही परंपरा आहे. इंग्रजाच्या काळामध्ये इंग्लंडमध्ये खूपच थंडी असे व थंडीच्या बचावासाठी तेथील लोक हे काळ्या रंगाचा कोट घालून न्यायालयामध्ये येत असे.
इंग्रजांकडून चालत आलेली गुलामीची ही देखील एक निशाणी आहे. असे देखील म्हणता येऊ शकते कारण ही प्रथा अगोदर इंग्रजांद्वारे सुरू करण्यात आली होती. ह्या प्रथेला भारतीयांनी पाठिंबा देऊन ही प्रथा पुढे सुरू ठेवली आहे.
इंग्लंड सारख्या थंड हवेच्या ठिकाणी काळा कोट घालून कामकाज करणे सहाजिकच आहे. परंतु भारतासारख्या उच्चतम तापमान असलेल्या देशांमध्ये अशा प्रकारे कपडे वापरणे जरा विचित्रच वाटत असते.
Post a comment