हे तर सर्वांना माहीतच आहे की रावणाचा भाऊ बिभीषण व कुंभकरण होते. विभीषण हा भगवान श्री रामा कडे गेला होता कारण विभीषण हा विष्णुभक्त होता तसेच तो राम भक्त देखील होता. परंतु कुंभकरण हा आपल्या भावाच्या बाजूने लढत होता.

जेव्हा विभीषण रामाकडे भेटायला गेला होता तेव्हा त्याने आपल्या परिवाराबद्दल बरेच काही सांगितले होते.विशेषणाने सांगितले होते की आमचे पूर्वज हेती आणि प्रहेती नावाचे दोन बंधू होते. या दोघांनी ह्या महाद्वीप वर कब्जा मिळवला होता आणि येथे अलंकापुरी वसवली होती.

अनेक वर्षांनंतर इंद्राने विष्णूच्या साह्याने वैद्यांना हरवून या द्वीप वर कब्जा मिळवला. दैत्य राजा पळून गेले त्यानंतर कश्यप ऋषी यांचे पुत्र कुबेर ने राजा म्हणून लंकापुरी वर राज्य केले. लंकापुरी परत मिळवण्यासाठी आमचे आजोबा मालगवान यांनी सुंदरी षोडसी माता चा विवाह कश्यप ऋषी सोबत करून दिला.

ज्याद्वारे आम्हा तिघा भावाचा जन्म झाला दशासन, कुंभकरण आणि मी म्हणजेच विभीषण व एक बहीण जीचे नाव शुरपणाखा असे आहे. तरुण असताना दशासन रावणाने अलंकापुरी गाठली आणि कुबेराला निवेदन केले की लंकापुरीत आई तर्फे त्याचा अधिकार असेल. शेवटी कुबेराने लंका रावणाला देऊन टाकली.

याच प्रमाणे लंका अगोदरच्या काळापासून दैत्यांच्या अधिकारांमध्ये राहिलेली आहे. एकोणिसाव्या शतकामध्ये इंग्रजांनी या बेटावर अधिकार मिळवून याला सिलोन असे नाव दिले. आजादी नंतर सिलोन चे नाव संसदेमध्ये सर्व मताने श्रीलंका ठेवण्यात आले. या बेटावर सिगारीया या नावाची एक टेकडी आहेअसे मानले जाते की येथे रावणाची लंकापुरी वसलेली होती.

Post a Comment

Previous Post Next Post