
अमिताभ बच्चन यांना तर सर्वजण ओळखत असेल. बॉलीवूड चित्रपट सृष्टीमध्ये बिग बी म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्याबरोबर बीग बी यांनी काम केले आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये जे काही मिळवले आहे ते सर्व आपल्या हिमतीने मिळवले आहे.
कदाचित याच कारणामुळे बरेचसे लोक आहेत जे अमिताभ बच्चन यांची खूपच इज्जत करत असतात. त्यांच्या लहानपणा विषयी बोलले गेले तर त्यांचे आई-वडील काही मोठे श्रीमंत नव्हते अमिताभ एका गरीब घरातून जन्माला आले होते.
अमिताभ नेहमी आपल्या लहानपणीचा एक किस्सा सांगत असतात. ते असे सांगतात की जेव्हा आपण मला क्रिकेट क्लब मध्ये सामील व्हायचे व्हायचे असे. त्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी दोन रुपये एवढे पैसे लागत असे. त्या काळात दोन रुपयाला देखील खूपच किंमत होती.
तेव्हा अमिताभ बच्चन काही पैसे कमवत नसे. त्यामुळे ते नेहमी आपल्या आईकडे जात असे, यावेळीही ते आईकडे गेले आणि आणि आईला दोन रुपये मागितले. अमिताभ पैसे मागताना आईला असे म्हणाले की मला क्रिकेट क्लब जॉईन करायचा आहे त्यासाठी मला दोन रुपये हवे आहेत.
परंतु यावर त्यांच्या आईने मनाई केली त्यावेळी अमिताभ यांच्या आईकडे पाच रुपये होते तरीदेखील त्यांनी अमिताभ यांना दोन रुपये दिले नाही. त्यांनी अमिताभ यांना असे म्हटले की माझ्याकडे पैसे नाहीत.
त्यानंतर अमिताभ बच्चन यांना कळाले की पैसे खूप महत्त्वाचे असतात. त्यांना पैशाची खरी किंमत तेव्हा कळाली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून बघितले नाही. खूप कष्ट केले आणि खूप पैसे मिळवले. आज त्यांना कुठल्याही गोष्टीची कमी नाही, बॉलीवुड चित्रपट सृष्टीतील सर्वात श्रीमंत अभिनेते म्हणून अमिताभ बच्चन यांना ओळखले जाते.
Post a comment