चित्रपट सृष्टी मध्ये नवनवीन घटना घडत असतात. येथे दररोज प्रेम प्रकरण लव अफेयर व तलाख देण्यासारख्या घटना घडत असतात. ज्यामुळे यावर चर्चा देखील होत असते. बॉलिवूडमध्ये असे बरेचसे अभिनेते आहेत ज्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला जवळपास अनेक वर्षांपर्यंत संसार करून तलाक दिला आहे.

त्यानंतर दुसरे लग्न देखील केले आहेत. या कलाकारांच्या मुली आपल्या लग्न केलेल्या दुसऱ्या पत्नीच्या वयाच्या बरोबरीच्या आहे असे असून देखील त्यांनी लग्न केले आहे. थोडक्यात सांगायचे झाल्यास ह्या कलाकारांनी आपल्या मुलीच्या वयाच्या अभिनेत्रींशी लग्न केले आहे. यामुळे सावत्र आई व मुलगी जवळपास सारख्याच असतात. आजच्या लेखात आपण बॉलिवूडमधील अशा काही सावत्र आई व मुलीच्या जोड्या बघणार आहोत.

1. सोनी राजदान आणि पूजा भट्ट :- बॉलिवूडमधील सर्वात सफल असलेले चित्रपट निर्माते महेश बटन यांनी दोन लग्न केले आहेत. पहिली पत्नी किरण भट्ट व महेश भट्ट यांना एक मुलगी आहे तिचे नाव पूजा भट्ट असे आहे. परंतु महेश भट्ट यांची दुसरी पत्नी सोनी राजदान व पूजा भट्ट यांच्या वयामध्ये पंधरा वर्षाचा फरक आहे. पूजा भट्ट आपल्या सावत्र आई पेक्षा फक्त 15 वर्षाने लहान आहे.

2. मान्यता दत्त आणि त्रिशाला दत्त :- हे तर सर्वांना माहीत आहे की संजय दत्त यांनी तीन लग्न केले आहे. संजय दत्त यांची तिसरी पत्नी मान्यता दत्त ही आहे. संजय दत्त यांच्या पहिल्या पत्नीचे नाव पूजा शर्मा होते तिच्यापासून त्रिशाला दत्त जन्माला आली होती. त्रिशाला ही आपल्या सावत्र आई म्हणजेच मान्यता दत्त पासून फक्त आठ वर्षाने छोटी आहे.

3. करीना कपूर आणि सारा अली खान :- करीना कपूर आणि सारा अली खान या दोघींचे नाते सावत्र आई व मुली चे आहे. सारा अली खान ही सैफ अली खान व अमृता सिंग यांची मुलगी आहे. सैफ अली खान यांच्या पहिल्या पत्नीचे नाव अमृतासिंग आहे। यांनी अमृताला तलाक दिल्यानंतर करीना शी लग्न केले करीना व सारा अली खान यांच्या वयातील अंतर हे पंधरा वर्षाचे आहे.

4. परवीन दुसांज आणि पूजा बेदी :- 43 वर्षीय परविन दुसांज यांनी 49 वर्षीय अभिनेत्री पूजा बेदी यांचे पिता कबीर बेदी यांच्याशी लग्न केले आहे. यामुळे परविन दुसांज आणि पूजा बेदी सावत्र आई व मुलगी आहे. पूजा दुसांज आपल्या सावत्र आई पेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post