बॉलीवूडमधील किंग खान म्हणजेच शाहरुख खान. शाहरुख खान चे चाहतावर्ग खूप मोठा आहे. सध्या आयपीएल मुळे तर शाहरुख खान जास्त चर्चेत आहे. शाहरूखचे अनेक चित्रपट प्रदर्शित होत असतात व लोकप्रिय देखील ठरत असतात.

सोशल मीडियावर देखील शाहरुखचे अनेक चाहते आहेत. शाहरुखने एखादा फोटो शेअर केल्यावर त्याच्यावर हजारो-लाखो कमेंट चा वर्षाव होत असतो.

शाहरुखला देखील त्याचे चाहतावर्ग कमेंट द्वारे अनेक कमेंट करून प्रश्न विचारत असतात. शाहरूखचा एका फ्रेंड ने शाहरुखला एक अशी कमेंट करून प्रश्न विचारला होता की, "शाहरुख भाई मन्नत बेचनी है क्या?"

शाहरुखच्या एका चाहत्याने शाहरुखला असा हा आगळावेगळा प्रश्न विचारून सर्वांना चकित करून टाकले आहे. या प्रश्नावर शाहरुखने देखील प्रत्युत्तर दिले आहे. शाहरुखने उत्तरामध्ये असे लिहिले आहे की, "भाई मन्नत बिकती नही सर झुका कर मांगी पडती है। याद रखोगे तो लाइफ में कुछ पा सकोगे।"

अशा प्रकारची आगळीवेगळी कमेंट करून शाहरुखने आपल्या चाहत्याला असे उत्तर दिले आहे. तर आणखी एका चाहत्याने शाहरुखला असाच एक प्रश्न विचारला होता की शाहरुख भाई लग्नाला 29 वर्ष पूर्ण झाले आहे गौरी मॅडम ला काय गिफ्ट दिले आहे.

शाहरुखने ह्या आगळ्यावेगळ्या प्रश्नाला देखील एक छानसे उत्तर दिले आहे. शाहरुखने उत्तरांमध्ये असे लिहिले आहे की, "मैं अपने जीवन के सबसे बड़े गिफ्ट को क्या गिफ्ट दे सकता हूं?"

शाहरुख सध्या अनेक प्रोजेक्टवर काम करत आहे. लवकरच शहरुख 'पठाण' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्यासोबत जॉन अब्राहम देखील दिसणार आहे. शाहरुख खान राजू हिरानी यांची सोशल कॉमेडी फिल्म मध्ये देखील काम करत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post