चंद्रगुप्त मौर्य ला चक्रवर्ती सम्राट बनवणारे महान नीती तज्ञ आचार्य चाणक्य यांच्या नीती विषयी सर्वांनाच माहिती असेल. आचार्य चाणक्य इतके महान ज्ञानी आणि हुशार होते की त्यांनी चंद्रगुप्त मौर्याला चक्रवर्ती सम्राट बनवून टाकले होते. आजही त्यांच्या काही नीती जर एखाद्या सामान्य व्यक्तीने त्याच्या आयुष्यात वापरल्या तर ती व्यक्ती कधीही अयशस्वी होऊ शकणार नाही. चाणक्याने अनेक नीतिसूत्रे सांगितले आहे ज्याचे पालन लोक अजूनही करतात. आजच्या या लेखातून चाणक्यांनी सांगितलेले असे चार प्रकारचे लोक ज्यांच्या सोबत राहणे म्हणजे मृ त्यू सोबत राहण्याच्या बरोबरीत आहे. तर जाणून घेऊयात कोण आहेत हे, ज्यांच्या सोबत कधीही राहू नये.

1. चरित्रहीन स्त्री :- चाणक्याचे असे मत आहे की दुसऱ्या पुरुषांविषयी विचार करणाऱ्या स्त्री सोबत राहणे म्हणजेच नरकात राहण्यासारखे आहे. जर एखाद्या स्त्रीचे चरित्र चांगले नसेल तर तिच्यासोबत कधीही राहू नये. जर एखादी स्त्री आपल्या पतीवर खूप निष्ठा ठेवून प्रेम करत असेल तर त्या वैवाहिक जोडप्याचे जीवन सफल होऊन जात असते.

2. खोटे मित्र :- आपल्याला ह्या गोष्टीची पारख करता आली पाहिजे की आपला कोणता मित्र खरा आहे आणि कोणता मित्र हा खोटा आहे. कोण आपल्याशी कसा वागतो हे आपल्याला अगोदरच कळाले पाहिजे. मित्राच्या रूपात कोणता शत्रू आपल्या भोवती फिरत आहे हे देखील समजून घेणे तितकेच महत्त्वाचे असते. खोटा मित्र तुम्हाला असफलते मध्ये ढकलून देत असतो त्यामुळे अशा मित्रांमध्ये कधीही राहू नये.

3. बदमाश नोकर :- असा नोकर जो आपल्या मालका विषयी वफादार नाही अशा नोकराला कधीच कामावर ठेवू नये. त्यामुळे आयुष्यात खूप मोठे तुफाना एवढे संकट येऊ शकते. अशा नोकरांना योग्य वेळी ओळखून त्यांना बाहेर काढून देणे उचित ठरेल.

4. सापांचे निवास्थान :- ज्या ठिकाणी साप राहात असतात तेथे कधीही राहू नये, कारण साप कधीही तुम्हाला मृ त्यूच्या दरीत ढकलवु शकतात.

Post a Comment

Previous Post Next Post