कोणाचे नशीब कधी उघडेल काहीही सांगतात येत नाही. कधी कुणाकडे खायला अन्न नाही राहत नसते तर कधी त्याच्याकडे करोडो रुपये येत असतात. असे बरेचसे उदाहरणे आपण बघितले असेल. असेच एक उदाहरण उत्तराखंडमध्ये बघायला मिळाले आहे. उत्तराखंड मधील दर्शन सिंग बिष्ट यांचे नशीबच पलटून गेले आहे. तब्बल एक करोड रुपये एवढे पैसे त्यांनी जिंकवले आहेत.

तुम्हाला असे वाटत असेल की हि एक अफवा असेल पण नाही हे सर्व खरे आहे. उत्तराखंड मधील गैरसैण मध्ये राहणारे दर्शन सिंग बिष्ट यांनी यांनी आयपीएल खेळाच्या दरम्यान माय इलेवन या ॲपवर त्यांनी आपली टीम बनवली होती आणि या टीम वर पैसे लावले होते यावरूनच त्यांनी एक करोड रुपये एवढे पैसे जिंकले आहेत.

दर्शन सिंग बिष्ट एका हॉटेलमध्ये नोकरी करत होते परंतु जेव्हा कोरोना देशात आला आणि लॉक डाऊन सुरू झाला त्यामुळे सर्व काही बंद झाले होते या दरम्यान हॉटेलही बंद झाले होते. म्हणून त्यांची नोकरी देखील गेली. परंतु जेव्हा आयपीएल सुरू झाले तेव्हा माय इलेव्हन सर्कल या ॲप वर त्यांनी आयपीएल मधील संघ किंगस इलेव्हन आणि दिल्ली कॅपिटल या मॅच वर त्यांनी आपला संघ बनवून त्यावर पैसे लावले.

त्यांनी बनवलेली टीम चा स्कोर सर्वात जास्त स्कोर होता. त्यामुळे त्यांना एक करोड रुपये तेवढी रक्कम मिळाली. ते असे सांगतात की आपण या पैशातून एक चांगला व्यवसाय सुरू करणार आहोत. तसेच आपल्या परिवारासाठी एक सुंदर घर देखील बांधणार आहेत. लॉक डाऊन मुळे त्यांची नोकरी गेली होती. परंतु ह्या जिंकलेल्या कमाईतून ते स्वतःचा व्यवसाय सुरू करून आपले घर चालवणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post