द कपिल शर्मा शो हा टीव्हीवरील एक खूपच लोकप्रिय शो आहे. या शोमध्ये अनेक बॉलिवूडचे सुपरस्टार येत असतात. तसेच येथे बऱ्याचशा चित्रपटांचे प्रमोशन साठी देखील अनेक दिग्दर्शक व चित्रपटाची टीम येत असते.

हा शो खूपच कॉमेडी शो आहे. मागच्या काही दिवसांमध्ये या शोमध्ये मराठमोळे रितेश देशमुख व त्यांची पत्नी जेनेलिया देशमुख डिसुजा हे दोघे आले होते.

या शोमध्ये कपिल शर्मा हे रितेश व जेनेलिया दोघं बरोबर गप्पा मारत आहेत. हा शो खूपच हास्यास्पद पद्धतीने लोकांसमोर दाखवला जातो. जेव्हा कपिल शर्माने जेनेलियाला विचारले की चित्रपट मस्ती मध्ये रितेश च्या पत्नी चे पात्र निवडण्याचे काम हे डायरेक्ट चे होते यावर मध्येच रितेशने बोलून सांगितले की, नाही, खरे तर मिलाप झावेरी ने इंद्र कुमार यांच्यासोबत भेटून आम्हाला कास्ट केले होते.

यामध्ये अजब गोष्ट ही होती की आम्ही 2002 मध्ये एकमेकांना डेट करणे सुरू केले होते. आणि 2003 मध्ये एक असा सिक्वेन्स येतो की ज्यामध्ये आमचे लग्न होत आहे.

चित्रपटा मध्ये एका वर्षाच्या डेटिंग नंतर दोघेही जण लग्न करत होते. आम्हाला आमचे भविष्य काय आहे हे ठाऊक नव्हते परंतु तो सीन आम्हाला खूपच आवडला होता असे जेनेलियाने सांगितले.

रितेश ने पुढे असे विचारले ते चित्रपटांमध्ये तुम्ही आपल्या सर्व पगार आपल्या पत्नीकडे आणून देत असतात परंतु खऱ्या आयुष्यात मध्ये देखील तुम्ही असे करता का यावर रितेश म्हणाला की, माझ्या पत्नीने माझ्यापेक्षा जास्त पैसे कमावले आहे आणि या गोष्टीचा मला खूपच अभिमान देखील आहे.

Post a Comment

Previous Post Next Post