एकादशी ही तिथी हिंदू धर्मामध्ये खूपच महत्त्वाची मानली जाते. एकादशी या दिवसाला हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे. या दिवशी अनेक लोक दिवसभर उपासना करत असतात. तसेच भगवंताचे नामस्मरण देखील करत असतात.
तुम्हाला माहिती आहे का की एकादशी च्या ह्या दिवसाला कशाप्रकारे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक महिन्यामध्ये शुक्ल व कृष्ण असे दोन पक्ष असतात. दोन्ही पक्षाच्या अकराव्या तिथीला एकादशी असे म्हटले जाते.
अशाप्रकारे महिन्याला दोन एकादशी असतात म्हणजे संपूर्ण वर्षभरामध्ये एकूण 24 एकादशी असतात. प्रत्येक महिन्याला दोन एकादशी असतात ह्या दोन्ही एकादशीला व्रत केले जाते व भगवंताचे नामस्मरण केले जाते.
अश्विन मासा मधील शुक्ल पक्षाची एकादशी ही 27 तारखेला होती. या एकादशीला पापांकुश एकादशी असे म्हटले जाते. या दिवशी भगवंताचे पूजन केले जाते व दिवसभर व्रत देखील केले जाते.
अशातच एकादशीच्या दिवशी काही असे सोपे उपाय केल्यामुळे आपल्याला नक्की फायदा होत असतो.
एकादशीच्या दिवशी संध्याकाळी शुद्ध गाईच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचा दिवा लावावा. हा दिवा घराच्या उत्तर व पूर्व दिशेमध्ये लावल्यास आर्थिक फायदा होत असतो.
एकादशीच्या दिवशी वृक्षारोपण करणे खूपच चांगले असते. घराच्या उत्तर दिशेला प्रत्येक एकादशीला तुळशीचे एक रोप लावावे.
एखाद्याला विवाह संबंधीच्या काही अडचणी येत असतील तर केळीच्या झाडाच्या खोडामध्ये दिवा लावावा यामुळे विवाह संबंधीच्या सर्व समस्या दूर होतात.
एखाद्या महिलेला पुत्रप्राप्तीची समस्या येत असेल तर त्या महिलेने एकादशीच्या दिवशी आवळ्याचे झाड अंगणात लावावे नक्कीच फायदा होईल.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.
Post a comment