चित्रपट सृष्टी मधील एक दमदार अभिनेता म्हणजेच कादर खान. कादर खान यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर व आपल्या लेखणीच्या जोरावर सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनामध्ये एक अढळ स्थान निर्माण केले होते. त्यांनी बऱ्याचशा चित्रपटांचे संवाद देखील लिहिलेले आहे. चित्रपट कोणताही असो कॉमेडी असो किंवा दुसरा कोणताही असो त्यामध्ये कादर खान यांनी एकदम जबरदस्त भूमिका साकारली आहे.

त्यांना चित्रपट सृष्टी मधील ऑलराऊंडर म्हणून ओळखले जायचे. कारण त्यांनी फक्त चित्रपटांमध्ये काम केले नव्हते तर त्या व्यतिरिक्त त्यांनी बऱ्याचशा चित्रपटांच्या संवाद लिहिले होते. आज कादर खान यांची बर्थ एनिवर्सरी आहे. आज आम्ही तुम्हाला कादर खान यांची एक अशी इच्छा सांगणार आहोत जी आधुरी राहिली होती. त्यांना ही इच्छा पूर्ण करायची होती परंतु त्याआधीच त्यांचा मृ-त्यू झाला.

कादर खान व अमिताभ बच्चन यांनी एकमेकांबरोबर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे त्यांची जोडी अनेकांना आवडत असे. अदालत, सुहाग, मुकद्दर का सिकंदर, नसीब आणि कुली सारख्या अनेक चित्रपटामध्ये त्यांनी आपला अभिनय साकारला. त्यांनी अमर अकबर एंथनी, सत्ते पे सत्ता आणि शराबी यांसारख्या चित्रपटांचे डायलॉग देखील लिहिले.

त्यांचे एक स्वप्न असे होते की त्यांना अमिताभ बच्चन ला घेऊन एक चित्रपट बनवायचा होता. परंतु ही त्यांची इच्छा अधुरी राहिली आहे. कादर खान यांनी एका मुलाखतीमध्ये असे सांगितले होते की अमिताभ बच्चन, अमरीश पुरी आणि जयाप्रदा यांना घेऊन ते एक चित्रपट बनवू इच्छित होते. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील ते स्वतः करणार होते. परंतु चित्रपट कुली मध्ये अमिताभ बच्चन यांना इजा झाली व ते अनेक महिने हॉस्पिटलमध्येच राहिले.

त्यांनी असे सांगितले की मी चित्रपटाला घेऊन खूपच सिरीयस झालो होतो. मी त्यासाठी बरेचशे काम सुरू केले. परंतु हॉस्पिटलमधून बाहेर आल्यानंतर अमिताभ बच्चन हे राजकारणात उतरले त्यानंतर मी हा चित्रपटाचे काम करणे बंद करून टाकले. अशाप्रकारे एक चित्रपट बनवण्याची इच्छा त्यांची अधुरी राहिली होती.

Post a Comment

Previous Post Next Post