
चित्रपट सृष्टी मध्ये अनेक दिग्दर्शक आहेत. त्यातील असे काही दिग्दर्शक आहेत जे एखाद्या नायकाप्रमाणे प्रसिद्ध झाले आहे. बॉलीवूड मध्ये एक सफल दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शक आदित्य चोपडा यांच्याकडे पाहिले जाते. 21 मे 1971 मध्ये मुंबई येथे जन्मलेले आदित्य बॉलिवूडमधील 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करून चित्रपटाला ब्लॉकबस्टर करून दाखवले.
आदित्य चोपडा हे चित्रपट सुट्टीतील एक नावाजलेले दिग्दर्शक यश चोपडा यांचे सुपुत्र आहे. आदित्य चोपडा यांनी चित्रपटसृष्टीतील एक सुंदर लोकप्रिय तसेच सफल ठरलेली अभिनेत्री राणी मुखर्जी सोबत लग्न केले आहे. राणी व आदित्य यांचे वैवाहिक जीवन खूपच आनंदाची आहे. दोघांना एक मुलगी देखील आहे. तिचे नाव आधिरा आहे.
लग्ना आधी राणी मुखर्जी व आदित्य चोपडा हे जवळपास दोन वर्ष लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिले होते. असे सांगण्यात येते की राणी सोबत लग्न करण्यासाठी आदित्य चोपडा यांनी आपले घर देखील सोडले होते. 2014 सायली राणी व आदित्य यांनी लग्न करून टाकले. दोघांनी अचानकपणे लग्न करून संपूर्ण चित्रपटसृष्टीला हैराण करून सोडले होते.
दोघेजण बऱ्याच काळापर्यंत एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये राहिले होते परंतु दोघांनी तेव्हा कधीही मिडियामध्ये एकमेकांसोबत प्रेम करत असल्याचे उघड केले नव्हते. एवढेच नाही तर दोघांना लग्नाआधी कोठेही एकत्र बघितले गेले नव्हते. मीडियाद्वारे असे सांगण्यात येत होते की दोघे जवळपास दोन वर्षापर्यंत लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहिले होते.
दिग्दर्शक आदित्य चोपडा यांची राणी मुखर्जी दुसरी पत्नी होती याआधी त्यांनी 2001 मध्ये पायल खन्ना सोबत लग्न केले होते. परंतु 2009 मध्ये आदित्यने पायल शी तलाक घेतला. मीडियाद्वारे अशा बातम्या येत होत्या की पायल व आदित्य यांच्या तलाकचे कारण राणी असल्याचे सांगितले जात होते. आदित्य यांनीच राणीला करण जोहर यांचा चित्रपट 'कुछ कुछ होता है' मध्ये काम मिळवून दिले
Post a comment