माधुरी दीक्षित व संजय कपूर यांची जोडी आपण 1995 मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'राजा' मध्ये बघितलेली आहे. त्यानंतर दोघे 1997 मध्ये चित्रपट मोहब्बते मध्ये परत एकत्र दिसले होते.

तेव्हापासून जवळपास तेवीस वर्षे पूर्ण झाले आहे तेव्हापासून अजूनही दोघांनी एकाही चित्रपटात एकत्र काम केलेले नाही. परंतु बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा दोघेजण एकत्र काम करताना दिसणार आहे. दोघे नेटफ्लिक्स वरील एका वेबसीरिज मध्ये काम करताना दिसणार आहे.

या वेब सिरीज चे निर्माता करण जोहर असतील. या सिरीजची आशा प्रकारे कथा असेल की ॲक्ट्रेस असलेली एका वेळी सुपरस्टार राहिलेली अभिनेत्री ची असेल. ही अभिनेत्री कुठल्याही नामोनिशान न ठेवता गायब होऊन जाते. या वेबसेरीज चे दिग्दर्शनाचे कार्य कोण करेल याचा आणखी खुलासा केलेला नाही.

परंतु यामध्ये संजय व माधुरी एकत्र दिसणार आहेत. दोघेजण या वेबमालिकेमध्ये दिसणार म्हटल्यावर दोघांचे फॅन खूप खुश झाले असतील. संजय कपूर मागील वर्षी रिलीज झालेला जगन शक्ती यांचा चित्रपट मिशन मंगल मध्ये दिसले होते.

तर माधुरी अभिषेक वरमन यांचा मेगा बजेट असलेला चित्रपट कलंक मध्ये संजय दत्त, आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय बरोबर दिसली होती. आता बघुयात की माधुरी संजय कपूर बरोबर प्रेक्षकांना किती आवडू शकते.

Post a Comment

Previous Post Next Post