आपल्या सुंदरतेच्या जोरावर व ॲक्टींग च्या जोरावर चित्रपटसृष्टीमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय-बच्चन. ऐश्वर्याने अमिताभ बच्चन यांचे चिरंजीव अभिषेक बच्चन बरोबर लग्न केलेले आहे व दोघांना आराध्या नावाची एक मुलगी देखील आहे. आज ऐश्वर्या चा वाढदिवस आहे. ऐश्वर्या राय-बच्चन सत्तेचाळीस वर्षाची झाली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिषेकने आपल्या पत्नीचा फोटो शेअर करून पत्नीस वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिषेक व ऐश्वर्या ची पहिली भेट 2000 मध्ये झाली होती. तेव्हा 'ढाई अक्षर प्यार के' या चित्रपटाची शूटिंग सुरू होती व तेव्हाच ऐश्वर्या व सलमान ची लव स्टोरी खूपच चर्चेत होती.
परंतु सर्वांना माहीतच आहे की नंतर दोघांचे नाते तुटले होते. सलमानबरोबर ऐश्वर्याचा ब्रेकअप झाल्या नंतर तिचे नाव विवेक ओबेराय सोबत जोडले जाऊ लागले. परंतु काही दिवसानंतरच विवेक सोबत देखील ऐश्वर्याचा ब्रेकअप झाला.
त्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यामध्ये आला अभिषेक बच्चन. ऐश्वर्या च्या अगोदर अभिषेक बच्चनचे करिष्मा कपूर सोबत लग्न ठरले होते. त्यांनी जवळपास एंगेजमेंट देखील उरकलवली होती. परंतु काही कारणास्तव दोघांचे लग्न होऊ शकले नाही.
त्यानंतर 2006 मध्ये चित्रपट 'उमराव जान' या च्या चित्रीकरणादरम्यान ऐश्वर्या व अभिषेक मध्ये प्रेम झाले. एका मुलाखतीमध्ये ऐश्वर्याने असे सांगितले होते की मला अभिषेक ने प्रपोज केला होता. ऐश्वर्याने सांगितले कि त्या वेळी आम्ही गुरु चित्रपटाचे प्रमोशन करत होतो.
त्यावेळी अभिषेकने नकली अंगठी घालून मला प्रपोज केला होता. असे ऐश्वर्याने तिच्या मुलाखतीत सांगितले आहे. आणि त्याच वर्षी ऐश्वर्याने अभिषेक बरोबर लग्न करून टाकले. ऐश्वर्या व अभिषेक च्या लग्ना मध्ये जवळपास सहा करोड रुपये एवढा खर्च झाला होता.
Post a comment