सारा अली खान केदारनाथ आणि सिंबा मध्ये तुम्ही तिच्या एक्टिंग ला खूपच पसंत केले असेल. कारण या चित्रपटांमध्ये तिने खूपच सुंदर अभिनय साकारला होता. ति फक्त दोनच चित्रपटामुळे संपूर्ण देशामध्ये फेवरेट बनली होती.
सारा अली खान फक्त चित्रपटा मुळेच नाही तर आपल्या खाजगी आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत येत असते. तिचे अनेक किस्से मिडीयाद्वारे सांगितले जातात. सारा खूपच चांगली असल्याचे दिसते. कारण ती जेव्हा पण कॅमेऱ्यासमोर येते तेव्हा नमस्ते आणि थँक्यू म्हटल्याशिवाय राहत नाही. साराने पुन्हा एकदा आपला विनम्र स्वभाव दाखवून दिला आहे.
सारा नुकतीच न्यूयॉर्क मधून आपल्या व्हेकेशन च्या सुट्ट्या संपवून परत आली आहे. साराला मुंबई एअरपोर्टवर स्पॉट केले. जेव्हा सारा फ्लाईट मधून उतरून आपल्या गाडी कडे जात होती, तेव्हा तिथे उपलब्ध लोकांची नजर तिच्यावर पडली.
बघता बघता सारा भोवती बरीच मोठी गर्दी जमा झाली. लोकांनी तिला चहूबाजूंनी घेरले. तिचे चाहते तिच्या सोबत सेल्फी काढण्यासाठी उतावळे झाले होते. यादरम्यानच निळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला एक व्यक्ती सारा सोबत सेल्फी काढण्यासाठी पुढे आला.
तो व्यक्ती इतका उत्साही होता की सेल्फी काढण्याच्या नादात तो साराचा खूपच जवळ जाऊन पोहोचला होता, आणि त्याने साराला टच देखील केले होते. साराने लगेच यावर रिॲक्शन केली, परंतु साराची रिॲक्शन रागावलेली नव्हती.
सारा मागे झाली व त्या व्यक्तीच्या डोळ्यात बघून त्याला बघू लागली. यावर त्या मुलाने समजून घेतले की साराच्या इतक्या जवळ येणे योग्य नव्हते. परंतु एवढे सारे घडूनही साराने आपला विनम्र स्वभाव दाखवून दिला. तिने त्या व्यक्ती सोबत सेल्फी देखील घेतला. साराच्या या विनम्र स्वभावाचे खूपच कौतुक केले जात आहे.
Post a comment