आज मी तुम्हाला सांगणार आहे की चेहरा धुताना तुम्ही कोणत्या गोष्टी चुकीच्या करता. .

हा तुम्ही एकदम बरोबर वाचले आहे. आज मी तुम्हाला काही चुका सांगणार आहे ते प्रत्येक जन करतात चेहरा धुताना आत्ता तुम्हाला वाटत असेल की ह्याच्यात काय एवढ चेहरा धुताना आम्ही चुका करतो.

पण होतात काही अश्या चुका आणि त्याचं चुका मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही ह्या चुका सुधारल्या तर तुमच्या स्किन साठी खूप फायदेशीर ठरतील. चला तर मग बघुया या कोणत्या चुका आहेत.

१ :- चेहरा धुताना कधी पण खूप जास्त थंड किंवा खूप जास्त गरम पाणी नाही वापरायचं कारण याच्या मुळे तुमच्या चेहऱ्याला त्रास होवू शकतो. तुम्हाला कोमट पाण्याने आपल्या चेहऱ्याला धुतले पाहिजे. जरा तुम्ही असे केले तर तुमचे चेहऱ्यावरील छिद्र साफ होतील. आणि ह्याच्या मुळे तुमची स्किन सुद्धा निरोगी राहील.

२ :- चेहरा धुताना कधी साबणाचा वापर करू नये भरपूर वेळा आपण बघितले असेल ज्या साबणाने आपण शरीराला धुतो त्याच साबणाने आपण चेहरा पण धुतो. कारण जी तुमची शरीराची स्किन आहे आणि जी तुमची चेहऱ्याची स्किन आहे ह्यात भरपूर फरक आहे. शरीराच्या स्किन पेक्षा चेहऱ्याची स्किन खूप जास्त कोमल आणि नाजूक असते म्हणून चेहरा धुताना कधी साबणाचा वापर करू नये. त्याच्या ऐवजी आपण हर्बल फेस वॉश चा वापर केला पाहिजे.

३ :- चेहरा धुताना खूपच हळू हळू चेहरा धुतला पाहिजे. एकदम रगडून चेहरा धुवायचा नाही यांच्या मुळे तुमची स्किन खराब होऊ शकते. आणि भरपूर स्किन चे प्रॉब्लेम होऊ शकतात. जसे तुमच्या स्किन वर सुरकुत्या सुधा येवू शकतात. म्हणून चेहरा निरोगी ठेवण्यासाठी अगदी नाजूक हातांनी चेहरा धुतला पाहिजे. आणि हळूवार पुसून घेतला पाहिजे. चेहरा पुसताना अगदी नाजूक पणे पुसला पाहिजे.

तर ह्या होत्या काही गोष्टी ज्या तुम्हाला चेहरा धुताना लक्ष्यात ठेवल्या पाहिजेत जर तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे स्किन प्रॉब्लेम होणार नाहीत आणि तुमची स्किन खूपच निरोगी राहील तर मी अशा करतो की तुम्हाला हा लेख आवडला असेल.

Post a Comment

Previous Post Next Post