बॉलिवूडमध्ये अशा अनेक सेलिब्रिटी आहे ज्या राजघराण्यातून आहेत. ज्यांच्याकडे इतका पैसा आहे की तुम्ही विचारही करू शकणार नाही. आज आम्ही या लेखामध्ये तुम्हाला एका ॲक्ट्रेस विषयी सांगणार आहोत.

ही ऍक्टरेस इतकी लोकप्रिय तर नाही परंतु ती इतकी श्रीमंत आहे त्यामुळे तिची चर्चा खूपच होत असते. या अभिनेत्रीकडे सोन्याचे घड्याळ चांदीच्या चपला आहेत. आम्ही ज्या अभिनेत्री विषयी सांगत आहोत त्या अभिनेत्रीचे नाव दिगंगना सूर्यवंशी आहे.

दिगंगना टीव्हीवरील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. या अभिनेत्रीला लहानपणी पासूनच एक्टिंग चे खूप वेड होते. असे सांगितले जाते की ती खूपच श्रीमंत परिवारातून आहे. दिगांगना सूर्यवंशी आपले आई-वडिलांची एकुलती एक मुलगी आहे.

कदाचित याच कारणामुळे ती लहानपणापासून एखाद्या राजकुमारी सारखी राहिली असेल. तिच्या जन्मदिवसाच्या दिवशी तिचे आई-वडील तिला दुधाने अंघोळ घालतात व त्या दिवशी ती चांदीची चप्पल देखील घालते आणि हैराण करून सोडणारी ही गोष्ट म्हणजे या अभिनेत्री कडे सोन्याचे घड्याळ आहे.

दिगांगना सूर्यवंशी ने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे. 'क्या हादसा क्या हकीकत' या सिरीयल मध्ये तिने पहिल्यांदा काम केले होते. परंतु ती घराघरात पोहोचली ती 'वीर की अरदास वीरा' या मालिकेमुळे.

दिगंगना ने फक्त मालिकांमध्ये काम केले नाही तर बॉलीवूडमध्ये देखील तिने काम केलेले आहे. फ्रायडे या चित्रपटांमध्ये तिने काम करून बॉलीवूडमध्ये यश मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु बॉलिवूडमध्ये तिचे एवढे नशीब खुलले नाही. परंतु ती अनेक मालिकांमध्ये दिसत असते.

Post a Comment

Previous Post Next Post