आपण सर्व जण सध्या दिवाळी येण्याची वाट बघत आहोत. दिवाळी अगदी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. सर्वजण घरात साफसफाई करण्यात व्यस्त झाले आहेत. तसे तरी आपण घरातील सफाई नेहमीच करतो. परंतु दिवाळीला घरातील कोपरा न कोपरा आपण साफ करतो. कारण जेथे स्वच्छता तेथे लक्ष्मी कारण दिवाळी दिवशी ज्या घरात स्वच्छता सुंदरता दिसेल त्याच घरात लक्ष्मी प्रवेश करते. अशी म्हण आहे की हात फिरे तेथे लक्ष्मी वसे म्हणजेच ज्या ठिकाणी स्वच्छता झाली तेथे लक्ष्मीचे आगमन झालेच समजा.

परंतु या दिवाळीत घराची स्वच्छता करताना या काही वस्तू तुमच्या हातात पडल्या तर लगेचच घरा बाहेर काढा. कारण या वस्तू जर तुमच्या घरात असतील तर देवी लक्ष्मीचे तुमच्या घरात आगमन होणार नाही. खूप वस्तू अश्या असतात ज्या आपण कधीतरी कामी पडतील म्हणून वर्षांन वर्षे सांभाळून ठेवतो. त्या वस्तूंची आपल्याला कधीच गरज भासत नाही. आणि जर एखाद्या वेळेस गरज पडली तरी ती वस्तू वेळेवर सापडत नाही. तरीही आपला त्या वस्तू वरील लोभ सुटत नाही. तरी या दिवाळीत या वस्तूंचा लोभ सोडा व यांना आदी या घराबाहेर काढा.

पहिली वस्तू

१:- फुटलेला किवा तडा गेलेला आरसा - आपण एखादा आरसा फुटला तरी ही तो घरात तसाच राहू देतो. परंतु यामुळे घरात नेहमी वाद विवाद भांडणे होत राहतात. घरात शांतता राहत नाही आणि ज्या घरात शांतता नाही त्या घरात लक्ष्मी येत नाही. म्हणून फुटलेला किंवा तडा गेलेला आरसा लगेचच घरातून काढून फेका.

दुसरी वस्तू

२:- बंद पडलेले घड्याळ - आपल्याला अशी सवय असते की कोठेही फिरायला गेलो की तेथून घड्याळ किंवा इतर वस्तू आपण घरी आणतो. मग कितीतरी घड्याळ घरात जमा होतात. एक बंद पडले की ते काढून आपण दुसरे लावतो व पाहिले तसेच ठेवतो. तसेच हातातील घड्याळाचे एक घड्याळ बंद पडले की आपण दुसरे घड्याळ घेतो व पाहिले तसेच राहू देतो. यामुळे घरात बंद पडलेली घड्याळ किती तरी जमा होतात. परंतु बंद पडलेले घड्याळ आपल्या भाग्याचे दरवाजे बंद करते म्हणून बंद घड्याळ घरात अजिबात ठेवू नये. एक तर ते दुरुस्त करून आणावे नाहीतर सरळ फेकून द्यावे.

तिसरी वस्तू

३:- बेडरूम मधील तुटलेला किंवा कर कर आवाज करणारा बेड - जर पती पत्नीचा बेड तुटलेला असेल त्यातून कर कर असा आवाज येत असेल तर ते लगेचच दुरुस्त करावे किंवा बदलावे नाहीतर पती पत्नीच्या वैवाहिक जीवनावर त्याचा वाईट परिणाम होतो. त्यांच्यात नेहमी वाद विवाद होत राहतात. म्हणूनच तुमचा बेड जर तुटलेला असेल त्यातून कर कर असा आवाज येत असेल तर ते लगेचच घराबाहेर काढा.

चौथी वस्तू

४:- फुटलेल्या किंवा तडा गेलेल्या फोटो फ्रेम किंवा पेंटिंग्ज - आपल्या घरात असणाऱ्या फोटो किंवा पेंटिंग्जचा आपल्या जीवनावर सकारात्मक तसेच नकारात्मक प्रभाव पडतो. म्हणून घरात फोटो किंवा पेंटिंग्ज लावताना नेहमी प्रसन्न शांत व आकर्षक असणे आवश्यक आहे. युद्धाचे फोटो मारामारीचे फोटो, बुडणारे जहाज, ताज महाल अश्या प्रकारचे पेंटिंग्ज घरात कधीही लावू नये. तसेच सकारात्मक फोटो असतील परंतु ते फाटलेले असतील फ्रेम खराब झाले असतील तर त्यातून नकारात्मकताच बाहेर पडते. म्हणून असे पेंटिंग्ज किंवा फोटो देखील घरातून कडून टाकावे. त्याच प्रमाणे बंद पडलेले इलेक्ट्रिक वस्तू सुधा घराबाहेर टाकाव्या.

पाचवी वस्तू

५ :- म्हणजे घराचा मुख्य दरवाजा - घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ नीटनेटका व आकर्षक असावा कारण इथूनच घरात लक्ष्मीचे आगमन होत असते. दार तुटलेले असेल त्याची कडी खराब झाली असेल किंवा रंग उडालेला असेल कर कर असा आवाज करत असेल तर ते लगेचच दुरुस्त करा.

६ :- खराब झालेले फर्निचर - तसेच घरातील एखादे फर्निचर खराब झाले असेल तर तेही लगेचच बाहेर काढा.

७ :- जुने कपडे - तसेच जुने झालेले फाटलेले कपडे असतील तर ते लगेचच बाहेर काढावेत. व्यवस्थित असलेले कपडे गरिबांना वाटावेत. आणि जे वापरण्या योग्य नाहीत ते टाकून द्यावेत.

जुने दिवे कधीही लक्ष्मी पूजनासाठी वापरू नयेत. दिवाळी झाली की ते सर्व दिवे वाहत्या पाण्यात प्रवाहित करावेत. तुटलेले चपला बूट असतील तर तेही दिवाळी पूर्वी घराबाहेर काढावेत. दिवाळीला घर स्वच्छ व नीटनेटके असावे.

८ :- जुनी लहान मुलांची खेळणी - लहान मुलांची खेळणी घरात खूप जमा झालेले असतील व आपण बाहेर गेलो की पुन्हा त्यांना खेळणी विकत आणतो. मग जुनी खेळणी बाजूला पडतात व नवी खेळणी मुले खेळायला घेतात. असे करून खेळणीचा ढीग जमा होतो. त्या महाग असल्याने ते टाकून पण देता येत नाहीत व वापरता पण येत नाहीत. व तश्याच पडून राहतात. पण त्यामुळे घरात नकारात्मकता व दरिद्रता प्रवेश करते म्हणून जुनी, बंद पडलेली, खराब झालेली आणि वापरात नसलेली खेळणी या दिवाळी पूर्वीच घरा बाहेर काढा.

व घरात लक्ष्मीची स्वागत स्वच्छ व नीटनेटके पणाने करा. तसेच पिण्याचे पाणी नेहमी उत्तर पूर्व दिशेला असावे. दिवाळीला आपण घरातील साफ सफाई तर करतोच परंतु घरातील काही व्यक्तींना कोणत्याही वस्तूचा वापर झाला की ती वस्तू तेथेच टाकून देण्याची सवय असते. जर ही सवय तुमच्याही घरात कोणालातरी असेल तर लगेचच ही सवय बदला. कारण ह्यामुळे घरातील सामान सर्व अस्ताव्यस्त होते व घर नीटनेटके दिसत नाही.

दिवाळीच्या दिवशी घरात केर कचरा अजिबात ठेवू नये. जर तुम्ही डस्त बिन घरात ठेवत असाल तर दिवाळी दिवशी तरी ते घराबाहेर ठेवा. घरात केर कचरा अजिबात ठेवू नये.

अश्या प्रकारे घरातील सर्व नकारात्मक वस्तूंना बाहेर काडून घराची तसेच मनाची देखील स्वच्छता करून आपल्याला ही दिवाळी अगदी आनंदात साजरी करायची आहे. आणि अश्या प्रकारे जर आपण दिवाळीची तयारी केली तर देवी लक्ष्मी आपल्या घरात नक्कीच येईल.

तुम्हा व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...!

Post a Comment

Previous Post Next Post