जर आपण एखाद्याला आरोग्याविषयी विचारले तर ती व्यक्ती हे सांगेन की नेहमी हसत राहिले तर आपण सुखी राहत असतो. तसेच हसणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरत असते. यामुळे अनेक प्रकारचे आजार होत नसतात. तसेच माणसाचा ताण तणाव कमी होतो. ज्यामुळे मानसिक आजार होण्याचा खतरा अतिशय कमी होत असतो.

त्यामुळे तुम्ही बघितले असेलच की एखाद्या पार्कमध्ये लोक मोठ्याने हसत असतात. हा सर्व प्रकार दिवसाच्या सुरुवातीला केला जातो यावरून तुम्हाला कळले असेल की हसणे हे शरीरासाठी किती महत्त्वाचे आहे. परंतु तुम्हाला हे माहिती आहे का की हसण्यासारखेच रडणे देखील शरीराला खूपच फायदेशीर असते.

हा दावा जपानमध्ये असलेल्या हिडफुमी योशीदा नामक व्यक्तीने केला आहे. तो लोकांना रडवून लोकांचा तणाव दूर करत असतो. एवढेच नाही तर तू गेल्या आठ वर्षापासून केवळ रडण्या द्वारे लोकांचे आजार बरे करत असतो. लोक त्याला प्रेमाने टियर टीचर असे म्हणतात.

लोकांना रडून त्यांचा इलाज करणारे जपानमधील हे इसम लोकांना अगदी मनापासून रडवायला लावतात व त्यानंतर लोकांना अगदी मोकळे वाटू लागते. या व्यक्तीकडे लोक गेल्यानंतर तो लोकांच्या डोक्यात असलेले सर्व तणाव बाहेर काढत असतो.

जपान मधील शेअर टेयर टिचर नावाने ओळखले जाणारे हिडफुमी योशीदा यांचा असा दावा आहे की हसण्या प्रमाणेच रडणे देखील शरीराच्या दृष्टीने खूपच फायदेशीर ठरत असते.

Post a Comment

Previous Post Next Post