काही अभिनेत्री असतात ज्या खूप कष्ट करून आपले नाव पुढे आणत असतात. यासाठी त्या अतिशय शून्यापासून वर पर्यंत आलेल्या असतात व आपल्या करिअरला त्या एक नवीन उंची गाठण्याचा प्रयत्न करत असतात.

परंतु काही अभिनेत्री अशा असतात ज्या खूप सक्सेसफुल झाल्या असल्या तरी त्या मधूनच आपले करिअर सोडून देत असतात. आजच्या या लेखामध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्री विषयी सांगणार आहोत. जीने बिझनेस मॅन पतीशी लग्न केल्यानंतर आपले करिअर सोडून दिले होते.

करियर सोडलेल्या या अभिनेत्रीने त्यानंतर एखाद्या महाराणी सारखे जगण्यास सुरुवात केली. कोण आहे ही अभिनेत्री हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर ही अभिनेत्री आहे करीना कपूर ची बहीण करिष्मा कपूर.

करिष्मा कपूर 90 च्या दशकातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वांना आवडणारी अभिनेत्री होती. करिश्माने 90 पासून 2000 पर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. परंतु 2003 मध्ये उद्योगपती संजय कपूर सोबत लग्न केल्यानंतर तिने करिअरकडे तेवढे लक्ष दिले नाही.

तिने जवळपास आपले करिअर सोडूनच दिले. तसे तर करिश्माने आपल्या लग्नानंतर अगदी काहीच चित्रपटांमध्ये काम केले. परंतु तोपर्यंत तिचे संपूर्ण करिअर संपले होते. त्यामुळे तिचे अनेक चित्रपट फ्लॉप होऊ लागले.

लग्नाच्या अनेक वर्षानंतर करिष्मा मध्ये व तिच्या पती मध्ये काही कारणास्तव भांडणे होऊ लागली आणि हे भांडणे थेट तलाक पर्यंत जाऊन पोहोचले. करिष्मा कपूर ला दोन मुले आहेत ही मुले तलाक नंतर आपल्या आईकडे राहात आहे. करिष्माने एकटीनेच आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post