सध्या हिवाळा हा ऋतू सुरू आहे. दिवाळी झाल्यापासून थंडी जरा जास्तच वाढली आहे. थंडीमध्ये अनेकांना वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. आपण अनेकदा बाजरीचे सेवन करत असतो. बाजरीचे सेवन म्हणजे बाजरीची भाकरी बनवून आपण खात असतो.

बाजरीची भाकरी ही अनेकांना आवडत असते. कारण बाजरीची भाकरी चपाती पेक्षा खुपच रुचकर लागत असते. तसेच कोणत्याही भाजीसोबत बाजरीची भाकर चांगली देखणी ठरत असते.

थंडीमध्ये बाजरीची भाकरी खाणे आरोग्यासाठी खूपच चांगले सांगितले गेले आहे. याचे आरोग्याच्या दृष्टीने अनेक फायदे आहेत. थंडीच्या च्या काळात भाजरी खावी असे आपण बर्‍याचदा ऐकले देखील असेल.

आता तुम्ही विचार करत असाल की थंडीमध्ये बाजरी खाण्याचे का सांगत असेल, तर बाजरीच्या भाकरी मध्ये आत मधून गर्मी असते. त्यामुळे शरीरामध्ये गरमाहट निर्माण होत असते. त्यामुळे थंडीच्या काळात बाजरीच्या भाकरीचे सेवन करावे असे सांगितले जाते.

बाजरीच्या भाकरी मध्ये बऱ्याच प्रमाणात कॅल्शियम असल्याचे सांगितले जाते. हे हाडांच्या जोडीच्या ठिकाणी खूप फायदेशीर ठरत असते. आरोग्याला अनेक आजारांपासून धोका निर्माण होत असतो परंतु बाजरीची भाकर यावर फारच उपायकारी ठरत असते.

बाजरी मध्ये भरपूर प्रमाणात डायरी फायबर असते हे तुमच्या कोलेस्ट्रॉल लेवल ला कमी करण्यासाठी उपयोगी ठरत असते. तसेच वजन वाढण्याच्या समस्येवर देखील हे खूपच उपायकारी ठरत असते.

असे सांगितले जाते की बाजरी मध्ये टायपटोफेम अमिनो ऍसिड असते. याचा भुक कमी करण्यासाठी खूपच मदतगार ठरत असते. यामुळे वजन देखील कमी होते.

Post a Comment

Previous Post Next Post