नमस्कार मित्रानो,

हिवाळी हंगाम असणे आणि गाजरची चर्चा न करणे असे शक्यच नाही. गाजर केवळ स्वादिष्ट नव्हे तर त्यात आरोग्य फिट राहणारे भरपूर गुण सुधा असतात. गाजरमध्ये खनिज ग्लायकोलाईट जीवनसत्वे आणि बीटा कॅरोटीन मोठ्या प्रमाणात आढळतात. आणि हे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. हिवाळ्यात येणारे लाल गाजर हे जीवनसत्व आणि पोषण समृद्ध मानले जाते. गाजरात खनिजे खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. डोळ्यांसाठी गाजर फार फायदेशीर आहे कारण हा "अ" जीवनसत्वाचा उत्कृष्ट स्त्रोत्र आहे वजन कमी करण्यासाठी देखील गाजर फायदेशीर आहे कारण त्यामध्ये कमी कॅलरीज असतात. हे केवळ डोळ्यासाठी फायदेशीर नाही तर गाजर खाण्याचे अनेक फायदे आहेत.

आरोग्य तज्ञ म्हणतात कि गाजर आठवड्यातून दोन दिवस खावे गाजरामध्ये बीटा कॅरेटिन नावाचा एक औषधी घटक असतो जो कॅन्सरवर नियंत्रण ठेवण्यास उपयुक्त आहे तसेच शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करते आणि हृदय रोगांपासून आपले संरक्षण करते.

चला तर मग आरोग्यासाठी गाजराचे फायदे जाणून घेऊया.

१ :- कंबर दुखी वर गुणकारी :- जर तुमची कंबर दुखत असेल तर अर्धा चमचा गाजराचा रस एक टीस्पून तूप आणि एक चमचा आले रस एकत्र करून रोज सकाळी ते रिकाम्या पोटी प्या. यामुळे कमरेची वेदना फार लवकरच कमी होतात.

२ :- जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल :- तर एक कप गाजराचा रस 50 मिलि पालकाचा रस आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून हे दररोज एक वेळा पिणे आवश्यक आहे यामुळे बद्धकोष्टते पासून लवकर आराम भेटतो.

३ :- फुफुसाचे संरक्षण :- सारख्या प्रमाणात गाजर पालक आणि टोमॅटो घेऊन त्याचा एक ग्लास रस काढा

त्यात अर्धा चमचा मध चांगले एकत्र करावे. व दिवसातून 1 ते 3 वेळा ते प्या हे ब्रोकाईट्स म्हणजे फुफ्फुसांच्या नळ्यांना आलेली सूज कमी करण्यास फायदेमंद आहे.

४ :- सांधेदुखी पासून आराम :- एक पेला गाजराच्या रसामध्ये पाव चमचा काळीमिरी पावडर आणि पाव चमचा मीठ घाला दररोज हा रस दिवसातून एकदा घ्यावे यामुळे सांधेदुखीच्या सर्व वेदनांपासून आणि सूज आल्याने होणाऱ्या वेदनेतून पुष्कळ लाभ मिळतो.

५ :- गाजर मधुमेह असलेल्या रोगांसाठी गुणकारी आहे :- त्यासाठी 100 मिली गाजराचा रस घ्या. यात दोन चमचे कारल्याच्या रस आणि दोन चमचे कांद्याचा रस घालावा. याचे सेवन दिवसातून दोनदा नियमितपणे करावे यामुळे मधुमेह सारख्या आजारावर भरपूर फायदा होतो. तर मित्रांनो तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून गाजराचे फायदे समजले असतील.

नोट :- जर तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती उत्तम वाटली, तर खाली दिलेल्या कमेन्ट बॉक्समध्ये तुम्ही कमेन्ट करू शकता. ही पोस्ट आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. या प्रकारे आम्ही नवीन माहिती लेखाच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येऊ. धन्यवाद!

Post a Comment

Previous Post Next Post