बॉलीवूड चित्रपट सृष्टीमध्ये अनेक नवनवीन घटना घडत असतात. येथे अनेक प्रेम प्रकरणे, रिलेशनशिप, ब्रेकअप यांसंबंधीचे किस्से देखील बर्‍याच प्रमाणात घडत असतात. यामुळे अनेक सेलिब्रिटीज खूपच चर्चेत येत असतात. आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्री विषयी सांगणार आहोत ज्यांनी टूथब्रश बदलावे तसे बदलले आहेत बॉयफ्रेंड.

कंगना राणावत :-

कंगना राणावत चे नाव अनेक सेलिब्रिटीज सोबत जोडले गेले आहे. कंगना चे आतापर्यंत पाच अफेयर राहिले आहेत. कंगनाचे नाव आदित्य पांचोली, अध्ययन सुमन, अजय देवगन, निकोलस लेफर्टि आणि ऋतिक रोशन सारख्या लोकप्रिय कलाकारांसोबत तिचे नाव जोडले गेले आहे.

दीपिका पादुकोण :-

खूप मेहनत घेतल्यानंतर चित्रपट सृष्टी मध्ये आपले नाव उंचावर नेणारी दीपिका पादुकोण चे देखील 9 लव अफेअर्स होते असे सांगितले जाते. दीपिका चे अफेअर हे उपेन पटेल, सिद्धार्थ माल्या, रणवीर कपूर, निहार पंड्या, मुजम्मिल इब्राहीम, क्रिकेटर एम एस धोनी, युवराज सिंग आणि रवी चौहान सोबत तिचे नाव जोडले गेले आहे.

आलिया भट्ट :-

चित्रपट सृष्टी मध्ये खूपच कमी वयामध्ये आपले नाव कमावणारी अभिनेत्री आलिया भट्ट चे देखील 6 लव अफेअर राहिले आहेत. असे सांगितले जाते तिचे नाव हे सिद्धार्थ मल्होत्रा अर्जून कपूर नवीन मित्तल अली ददारकर आणि रमेश दुबे सोबत जोडले जाते. व आता तिचे नाव रणवीर कपूर सोबत देखील जोडले जात आहे.

अनुष्का शर्मा :-

आपल्या करिअरच्या काळात बॉलीवूड मधील तिन्ही खान सोबत काम करणाऱ्या अनुष्का शर्माचे देखील सात अफेअर राहिल्याचे सांगितले जाते. अनुष्का चे नाव रणवीर सिंग, शाहिद कपूर, अर्जुन कपूर, सुरेश रैना, जोहेब युसूफ, रणबीर कपूर यांच्यासोबत अनुष्का चे नाव जोडले गेले होते. आता अनुष्काचा विवाह क्रिकेटर विराट कोहली सोबत झालेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post