1. पावसाळा असो किंवा हिवाळा गरम गरम भजे खाण्यास सर्वांना आवडत असते. त्या सोबत चहा असेल तर मग अतिउत्तम. भजे अधिकच सुंदर व रुचकर लागावे असे तुम्हालाही वाटत असेल तर, भज्याच्या या मिश्रणामध्ये थोडेसे दूध टाकावे. हे करत असताना एका गोष्टीची काळजी घ्या ती म्हणजे मीठ टाकताना दुधाच्या अगोदर टाकावे व त्यानंतर त्यामध्ये दूध टाकावे. यामुळे भजे खूपच कुरकुरीत लागत असतात.

2. तांदळाची खीर बनवताना त्यामध्ये चुटकी भर मीठ टाकावे. यामुळे खीर कमी गोड लागते तसेच तुम्हाला वाटत असेल की आपली खीर खूपच घट्ट व्हावी तर यामध्ये एक चमचाभर मक्याचे पीठ टाकावे.

3. बटाट्याचे पराठे बनवताना काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. पराठे बनवताना त्यांना टेस्टी बनवण्यासाठी त्यात एक चमचा भर कसूरी मेथी आणि मॅगी मसाला टाकावा. यामुळे बटाट्याच्या पराठ्याचा स्वाद आणखीनच वाढतो.

4. कढी बनवताना अनेकदा दही फुटून जात असते. अशावेळी एक काम करावे ते म्हणजे जेव्हा तुम्ही कढी बनवता तेव्हा त्याला शिजवत रहावे आणि नंतर त्यात मीठ टाकावे यामुळे दही फुटणार नाही.

5. एका भांड्यामध्ये पाणी भरून ठेवावे व त्यात पाणी टाकावे. यामुळे पनीर खूपच ताजे राहते या पाण्याला काही तासानंतर बदलत राहावे.

6. इडली किंवा डोसा बनवताना त्याच्या मिश्रणामध्ये एक चमचाभर मेथीचे दाणे टाकावी यामुळे इडली किंवा डोसा खूपच टेस्टी बनत असतो.

7. भात बनवताना पाण्याचा अंदाज ठेवणे खूपच कठीण होऊन जाते. त्यामुळे पाणी कमी किंवा जास्त होत असते अशावेळी भात बनवताना त्यामध्ये एक चमचाभर तेल आणि लिंबाचा रस टाकावा. यामुळे भात मोकळा होत असतो व त्याची चव देखील चांगली लागत असते.

Post a Comment

Previous Post Next Post