टीव्ही सिरीयल तारक मेहता का उल्टा चष्मा खूपच प्रसिद्ध आहे. सिरीयल भारतातील प्रत्येक घरामध्ये पाहिले जाते. असे म्हणायला काही वावगे ठरणार नाही. या रियल मध्ये अनेक पात्र आहेत. ही सिरीयल पाहताना सर्वजण हसून हसून वेडे होत असतात.

या सिरीयल मध्ये जेठालाल हे पात्र आहे व त्याची पत्नी दया हे देखील एक पात्र आहे. यामुळे लोक खूप हसत असतात. तारक मेहता का उल्टा चश्मा जास्त टीआरपी असलेल्या कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम आहे.

या कार्यक्रमामध्ये काम करणारे म्हणजेच जेठालाल यांचे वडील जेठालाल के बापू असे म्हटले जाणारे अमित भट्ट 48 वर्षाचे आहे. बापूजी चा रोल त्यांना वयाच्या 36 वर्ष असताना मिळाला होता. एकदा त्यांनी असे देखील सांगितले होते की त्यांना हा रोल मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारची ऑडीशन द्यावी लागली नव्हती.

या शोसाठी त्यांची पहिली भेट या शोचे प्रोडूसर असित मोदी यांच्याशी एका हॉटेलमध्ये झाली होती. त्यानंतर त्यांना या रोलसाठी सिलेक्ट केले गेले होते. असे सांगितले जाते की अमित हे थेटर मधील खूपच नावाजलेले कलाकार आहेत. त्यांनी नाटका व्यतिरिक्त अनेक गुजराती हिंदी सिरीयल मध्ये काम केलेले आहे.

असे सांगितले जाते की तारक मेहता का उल्टा चश्मा या सीरियल च्या प्रत्येक एपिसोडला त्यांना सत्तर ते ऐंशी हजार रुपये चार्ज केला जातो. अमित हे इंस्टाग्राम वर आपल्या पत्नीबरोबर काही फोटो शेअर करत असतात. त्यांच्या लग्नाला वीस वर्षांपेक्षा जास्त काळ झालेला आहे त्यांना दोन मुले देखील आहेत

Post a Comment

Previous Post Next Post