बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान यांना बॉलीवूडचा बादशाह समजले जाते. शाहरूख खान केवळ भारतामध्येच नाही तर संपूर्ण जगभरात लोकप्रिय आहेत. देशामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे चाहते आहेत. बॉलीवूड मध्ये शाहरुख खान सोबत सर्वात सुंदर व रोमँटिक जोडी काजोल सोबतच मानली जाते.

शाहरुख खान आणि काजोल सर्वात लोकप्रिय व खूपच रोमॅंटिक असलेला चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' मध्ये एकत्र दिसलेले आहेत. चित्रपट 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' हा खूपच लोकप्रिय ठरला होता. परंतु या चित्रपटादरम्यान अभिनेता अजय देवगण आणि शाहरुख खान यांच्यामध्ये काही तणावपूर्ण गोष्टी झाल्याचे सांगितले जाते.

या कारणामुळे काजल यांचे पती अजय देवगन यांनी अजूनही दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट बघितलेला नाही. काय कारण होते याचे हे आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत.

असे सांगितले जात होते की हा चित्रपट बघण्याचे कारण करण अर्जुन हा चित्रपट होता. या चित्रपटांमध्ये अभिनेता अजय देवगन आणि शाहरुख खान एकत्र दिसणार होते. दोघे देखील चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार होते. चित्रपटाचे दिग्दर्शक राकेश रोशन हे होते.

परंतु अजय देवगण यांनी अशी मागणी केली की मला तोच रोल हवा आहे जो शाहरुख खान करणार आहेत. कारण अजय देवगन यांना असे वाटत होते की चांगली भूमिका ही शाहरुखला मिळालेली आहे. अचानक पणे चित्रपटाचे पात्र बदलण्यात येणार हे जाणून दिग्दर्शक राकेश रोशन घाबरून गेले.

त्यांनी अजय देवगन ला सांगितले की शाहरुख बरोबर याबाबतचे बोलणे करून घे, परंतु अजय देवगन खूपच नाराज झाले होते. त्यानंतर शाहरुख व अजय दोघांनीही चित्रपटात काम न करण्याचा निर्णय घेतला. तसे तर शाहरुख खानचा चित्रपटाची कथा देखील आवडत नव्हती.

दोघांनीही चित्रपटात काम करण्यास नकार दिला परंतु काही दिवसानंतर अजय यांना अशी बातमी मिळाली की शाहरुख यांनी पुन्हा चित्रपटात काम करण्यास होकार दिला आहे. या चित्रपटामध्ये शाहरुख बरोबर सलमान दिसणार होता. यानंतर बरेच वर्ष दोघे एकमेकांशी बोलत नव्हते.

Post a Comment

Previous Post Next Post