आता टेलिव्हिजनवर एकता कपूरची सिरीयल सुरू आहे जिचे नाव 'कसोटी जिंदगी की' असे आहे. प्रेक्षकांकडून या मालिकेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आहे.

या शोमध्ये काम करणारे कलाकार अक्षर ने सिरीयलच्या शूटिंग मधील होणाऱ्या घटनांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. अक्षर नेहमीच सिरीयल दरम्यान चे काही फोटो व्हिडिओ शेअर करत असतो.

अक्षर ने नुकताच आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सिरीयल मधील मुख्य अभिनेत्री एरिका फर्नांडिस हिने आपल्या इन्स्टाग्राम वर देखील ठेवला होता.

या व्हिडिओमध्ये एरिका बिना घागऱ्याची सेट वर पोहोचली होती. एरिकाला पाहून सिरीयल चे दिग्दर्शक यांनी तिला ध्यानात आणून दिले की तू तर घागरा घातलेला नाही. या व्हिडिओमध्ये एरिका फर्नांडिस ने ट्रॅडिशनल कपडे घातले आहे.

या कपड्यांमध्ये एरीका खूपच सुंदर दिसत आहे. परंतु एरिकाने खाली घागऱ्या च्या जागी जीन्स घातली आहे. सोशल मीडियावर आता हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. यावर भरपूर कमेंट देखील येत आहे.

सोशल मीडियावर कुठलाही व्हिडिओ अगदी सहजपणे व्हायरल होत असतो. एखादा व्हिडिओ जर लोकांना वेगळा वाटला तर लोक अशा व्हिडिओला अनेक ठिकाणी शेअर करत असतात आणि अशाच प्रकारे हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. कसोटी जिंदगी की मालिके ची निर्मिती एकता कपूर ने केली आहे जी प्रेक्षकांना खूप आवडते.

Post a Comment

Previous Post Next Post