बॉलीवूड चे अभिनेते व नवाब सैफ अली खान आणि बेबो म्हणजेच करीना कपूर खान यांचे सुपुत्र तैमुर अली खान खूपच लहान वयात लोकप्रिय झाले आहेत. सोशल मीडियावर त्याचे विविध फोटो व्हायरल होत असतात. ताईमुर अली खान हा एक स्टार किड्स आहे व तो अनेकदा चर्चेत देखील राहिला आहे.
तैमुर अली खान लवकरच मोठा भाऊ बनणार आहे व तो आपल्या वडिलांसोबत शेतामध्ये शेती करताना दिसत आहे. याबाबतचे काही फोटो सोशल मीडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहेत. यामध्ये तैमुर शेती कशी करतात हे शिकत आहेत. हे फोटो सोशल मीडियावर खूपच वेगाने व्हायरल होत आहेत.
यातून असे दिसते की सैफ अली खान यांचे सुपुत्र हे त्यांना कामात मदत करू लागले आहेत. या फोटोमध्ये तैमुर सोबत त्याचे वडील सैफ अली खान हे शेताला पाणी देताना दिसत आहेत. आता सैफ अली खान आपला येणारा चित्रपट भूत पोलीस साठी दलहुजी मध्ये शूटिंग करत आहे.
शेती करतानाचे हे दृश्य मागील महिन्यातील पटोदीतील त्यांचे शॉर्ट हॉलिडे मधील आहेत. याआधी देखील तैमुरचे अनेक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले आहेत. यामध्ये तैमुर वेगवेगळ्या करामती करत असतात व याचे फोटो तैमुर ची आई करीना तिच्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करत असते. तैमूर लवकरच मोठा भाऊ बनणार आहे, सध्या करीना कपूर खान मुंबईमध्ये आहे.
Post a comment