एका अभ्यासाद्वारे असे सांगितले गेले आहे की आपण जर दररोज तीन कप चहा पिलो आणि चहा पिण्यासाठी प्लॅस्टिकचे कप वापरले तर दररोज आपल्या शरीरामध्ये 75000 सूक्ष्मकण जात असतात. अनेक ठिकाणी आपण बघत असतो की चहा देण्यासाठी हायड्रोफोबिक कपाचा उपयोग केला जातो.

आजकाल आपण बघत असतो की कोणत्याही चहाच्या दुकानात किंवा कोणत्याही लग्नसमारंभासाठी चहा किंवा कॉफी पिण्यासाठी प्लास्टिकच्या कपाचा उपयोग केला जातो. परंतु तुम्ही हे जाणून हे हैराण व्हाल की दररोज अशा कपामध्ये चहा पिणे तुमच्या शरीरासाठी घातक ठरू शकते.

आयआयटी खडकपूर च्या एका संशोधनाद्वारे ही गोष्ट समोर आली आहे की कागदाच्या चहा द्वारे चहा पिल्यास अनेक हानिकारक व विषारी पदार्थ पोटामध्ये जात असतात. जर एखादा व्यक्ती दिवसातून तीन वेळा या कपातून चहा पीत असेल तर अशा व्यक्तीच्या पोटामध्ये दररोज 75 हजार सूक्ष्मकण जात असतात. जे शरीरासाठी खूपच हानिकारक आहे.

तर अनेकांना वाटत असेल की प्लास्टीकच्या कपामध्ये चहा पिणे का हानिकारक असते. तर प्लास्टिक हे अनेक हानीकारक तत्वांनी बनवले जाते व प्लास्टिकला गरमपणा दिला तर ते पघळू लागते आणि आपण चहा पिताना गरमच पीत असतो त्यामुळे जर प्लास्टिकच्या कपात गरम पदार्थ टाकला तर पंधरा मिनिटांमध्ये हे प्लास्टिक पघळण्यास सुरू होत असते.

यामुळे या चहा द्वारे आपण अनेक प्लास्टिकचे कण पीत असतो. प्लास्टिकचे कप हे पोलिस्टरीन पासून बनवले जातात जे आरोग्यासाठी खूपच हानीकारक असल्याचे सांगितले जाते. यामुळे आपल्याला कॅन्सर देखील होऊ शकतो. तसेच पोट दुखणे किंवा एखाद्या गोष्टीची एलर्जी होणे यांसारखी समस्या येऊ शकते.

Post a Comment

Previous Post Next Post