बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पुढे कोणताही अभिनेता टिकू शकला नाही. त्यांनी आपल्या करिअरमध्ये प्रत्येक प्रकारचा चित्रपट केला. त्यांनी ॲक्शन, रोमॅंटिक आणि सस्पेन्स थ्रिलर असलेले चित्रपट देखील केले. त्यांचे चित्रपट इतके लोकप्रिय ठरले की रातोरात अमिताभ बच्चन स्टार होऊन गेले.

त्यांचे चित्रपट हे त्यावेळी खूपच लोकप्रिय ठरले होते. ते आजच्या या विसाव्या शतकात त्याचे रिमेक बनवले जात आहे. अमिताभ बच्चन यांचा खूपच लोकप्रिय ठरलेला चित्रपट डॉन हा चित्रपट शाहरुख खान नी पुन्हा बनवला तर अमिताभ बच्चन यांचाच चित्रपट अग्निपथ याचादेखील बॉलीवूड चित्रपट सृष्टीने हिंदी रिमेक बनवला ज्यामध्ये ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत दिसला होता.

आता अमिताभ बच्चन यांचा आणखी एक चित्रपटाचा रिमेक बनवला जाणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे नमक हलाल. 1982 मध्ये रिलीज झालेला नमक हलालने बॉक्स ऑफिस खूपच कमाई केली होती.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्मिता पाटील, परवीन बाबी, शशी कपूर आणि ओमप्रकाश या चित्रपटात दिसले होते. हा चित्रपट इतका लोकप्रिय ठरला होता की आजही लोकांच्या मनातून या चित्रपटाचे गाणे गेलेले नाही.

या चित्रपटाच्या राइट्स कबीर सिंग सारख्या लोकप्रिय चित्रपट बनवणारे प्रोड्यूसर मुराद खेतानी यांनी विकत घेतले आहे. मुराद यांनी एका मीडिया ला सांगताना असे सांगितले की या चित्रपटाला त्याकाळी प्रत्येक वयाच्या लोकांनी पसंती दर्शवली होती.

या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सध्या काम सुरू आहे. प्रोड्युसर मुराद खेतानी यांनी असे देखील सांगितले की अजून देखील अजून चित्रपटातील अभिनेत्यांची नावे जाहीर झालेली नाहीत.

Post a Comment

Previous Post Next Post