हे जग खूप मोठे आहे आणि या जगामध्ये अनेक मोठमोठे देश आहे. प्रत्येक देशाचे स्वतःचे काही नियम व काही कायदे कानून आहेत जे त्या देशातील लोकांना पाळावेच लागतात. परंतु हे नियम आपल्यासाठी खूपच अचंबित करण्यासारखे असतात.

जर आपल्याला कोणी म्हटले की ही पॅन्ट नको घालू किंवा अशा प्रकारे केस नको कापू तर आपल्याला राग येणारच. परंतु एक असा देश आहे जिथे लोकांचे स्वातंत्र्य देखील ओढवून घेतले आहे. एवढेच नाही तर लोकांचे खाजगी आयुष्य त्यांनी कसे जगावे याचे देखील येथे नियम आहेत.

याप्रकारे माणसाचे खाजगी आयुष्यावर काही नियम असणाऱ्या देशाचे नाव आहे नोर्थ कोरिया. आज आपण या देशांमध्ये असलेल्या काही हैरान करून सोडणार्‍या नियमांविषयी जाणून घेऊयात.

नोर्थ कोरिया हा असा एकमेव देश आहे जिथे लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे केस कापणे यावर बंदी आहे. येथे सरकार द्वारे 28 हेअर स्टाईल दिले गेले आहे. यांपैकीच स्टाईल द्वारे हेअर स्टाईल करायला हवी असा येथे नियम आहे.

येथे शाळेमध्ये देखील एक विचित्रच नियम आहे. येथील लोक लोकांना शाळेतील विविध वस्तू वापरण्याचे पैसे देऊन द्यावे लागतात. जसे की टॉयलेट साफ करणे, बेंच वापरणे, फळा वापरणे इत्यादी

नाद कोरियामध्ये फेसबुक व युट्युब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी आहे. येथे अशा प्रकारचे कोणतेही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म नाहीत.

नॉर्थ कोरियामध्ये आपल्या प्रमाणे कॅलेंडर नाही येथे या देशाचे वेगळेच कॅलेंडर आहे. ज्याला जोशो कॅलेंडर असे म्हटले जाते.

येथे लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे कपडे घालण्यावर देखील मनाई आहे. येथील महिलांना पॅन्ट घालण्यास मनाई आहे तर पुरुषांना जीन्स घालण्यास मनाई आहे.

Post a Comment

Previous Post Next Post