अनेक वैज्ञानिकांनी असे सिद्ध केले आहे की किटाणू चे प्रसारण हाता द्वारे होत असते. ज्यामुळे तुम्ही अनेकदा आजारी देखील पडत असता. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या भागांना हाता द्वारे स्पर्श करायला नको.
1. आपल्या कानामध्ये बोट किंवा आणखी कोणतीही वस्तू घालू नये. यामुळे कानामध्ये जखम निर्माण होऊ शकते. यासोबतच कानाद्वारे शरीरामध्ये किटाणू देखील प्रवेश करू शकतात. त्यामुळे शक्यतो कानामध्ये बोट घालू नये. तसेच कुठल्याही वस्तूला आत मध्ये टाकू नये.
2. आपल्या डोळ्याद्वारे देखील किटाणू अगदी सहजपणे शरीरात येत असतात. जर तुम्ही कधीही हातांना बिना साफ केल्याशिवाय आपल्या डोळ्यांना लावले तर किटाणू डोळ्यांद्वारे देखील आत मध्ये प्रवेश करू शकतात. त्यामुळे डोळ्यांना धुण्या अगोदर आपले हात साबणाने स्वच्छ धुऊन घ्यावेत
3. अनेकदा आपण आपला चेहरा धुण्यासाठी स्किन केअर प्रॉडक्ट लावत असतो. चेहरा धुण्या आधी तुम्ही तुमचा हाताना साबणाने स्वच्छ करावे व त्यानंतर चेहरा धुवावा. चेहरा धुवून झाल्यानंतर त्याला पुसून घ्यावे व त्याला पुन्हा टच करू नये.
4. नखांना कुरतडणे किंवा चेहऱ्याला परत परत हात लावणे. दोन्ही सवयी खूपच सामान्य आहे. अशा सवयींना शाळेमध्ये खूपच वाईट सांगितले जाते. आरोग्यासाठी देखील हे खूपच वाईट असते. नखांमध्ये बरेचसे किटाणू असतात जे तोंडाद्वारे आत जाऊ शकतात.
Post a comment