प्रत्येक महिलेला आई बनणे एखाद्या स्वप्नाप्रमाणे असते. प्रत्येक महिलेच्या आयुष्यामधील सर्वात सुखाचा क्षण म्हणजे त्या महिलेला हे कळणे की आपण आई बनणार आहोत. आज आम्ही तुम्हाला प्रेग्नेंसी संबंधीचे एक गोष्ट सांगणार आहेत जी प्रत्येकाला जाणून घ्यायला हवी.
प्रेग्नेंसी दरम्यान महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात. जसे की गर्भावस्थेमध्ये मेहंदी लावावी की नाही. दुसरे म्हणजे गर्भावस्थेमध्ये केसांना मेहंदी लावणे योग्य ठरेल कि अयोग्य अशा प्रकारचे अनेक प्रश्न मनामध्ये निर्माण होत असतात. यापैकी काय बरोबर काय चुकीचे हेदेखील अनेकांना माहिती नसते.
खरेतर बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या मेहंदी मध्ये अनेक केमिकल मिक्स केलेले असतात. या कारणामुळे त्याचा रंग देखील काळा असतो आणि ही मेहंदी काढल्यानंतर मेहंदीचा रंग देखील काळा होत असतो. अनेकांना ही मेहंदी टिकत नाही.यामुळे अनेकांना स्किन प्रॉब्लेम होत असतात.
जसे की हातांना खाज सुटणे, हाताची आग होणे असे बरेच काही. त्यामुळे शक्यतो गर्भावस्थेमध्ये असताना महिलांनी मेहंदी पासून दूरच राहणे योग्य ठरेल. कारण गर्भामध्ये असलेल्या मुलाच्या विकासावर याचा खूप गंभीर प्रभाव पडू शकतो.
जरी तुम्हाला मेहंदीचा उपयोग करायचा असेल तर तुम्ही नॅचरल हिना मेहंदी चाच उपयोग करायला हवा. बाजारामध्ये काळया रंगाची ब्लॅक हिना मेहंदी देखील उपलब्ध आहे.
परंतु गर्भवती महिलांनी चुकूनही मेहंदी लावू नये. यामुळे देखील अनेक साईड इफेक्ट होत असतात. परंतु ही मेहंदी तुम्ही इतर वेळी लावू शकता. बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या इतर मेहंदीपेक्षा हि मेहंदी जरा चांगली आहे यामध्ये कमी केमिकल वापरले जातात.
Post a comment