सैफ अली खान हा बॉलिवूडमधील एक नावाजलेला अभिनेता आहे. या काळामध्ये काही दिवसांपूर्वी एक इंटरव्यू खूप व्हायरल होत होता. ज्यामध्ये शर्मिला टागोर आपला मुलगा सैफ अली खान च्या बालपणाविषयी काही गोष्टी शेअर करत होत्या.

हैराण करून सोडणारी ही गोष्ट आहे की या इंटरव्ह्यूमध्ये शर्मिला टागोर यांनी सैफ अली खान यांच्या दुसऱ्या आई विषयी देखील सांगितले आहे. सैफ यांच्या आईने म्हणजेच शर्मिला टागोर यांनी सांगितले की जेव्हा सैफचा जन्म झाला त्यानंतर मी आपल्या कामामध्ये खूप व्यस्त होऊन गेले.

त्यानंतर सैफला वेळ देणे माझ्यासाठी खूप जड जाऊ लागले. मी अगदी थोडाच वेळ सैफ सोबत राहत असे. तेव्हा सैफच्या दुसर्‍या आईने त्यांचे संगोपन केले. सैफ च्या दुसऱ्या आईने त्याला त्याच्या खऱ्या आई प्रमाणेच प्रेम केले होते.

शर्मिला टागोर यांनी इंटरव्यू मध्ये असे सांगतात की भलेही मी सोहा आणि सभा ला पूर्णपणे वेळ देऊ शकले. परंतु सैफच्या बालपणा मध्ये मी त्याला वेळ देऊ शकले नाही. कारण मी त्यावेळी खूप व्यस्त होते.

त्यामुळे या काळात सैफला त्याच्या दुसऱ्या आईने सांभाळले. सैफच्या दुसऱ्या आईचे नाव मिसेस नुरानी होते. ज्या सैफला आपल्या मुला प्रमाणे वाढवत होत्या. फक्त मिसेस नुरानी नाही तर त्यांचे पती देखील सैफ चे लाड करत असे.

फक्त बालपणीच सैफ चे पालन पोषण मिसेस नूरानी यांनी केले नाही तर जोपर्यंत मोठा होत नाही तोपर्यंत त्या तेथेच राहिल्या आहेत. आता देखील मिसेस नुरानी त्याच्या प्रत्येक सुख दुःखा मध्ये सोबत असतात.

Post a Comment

Previous Post Next Post