थंडीच्या काळामध्ये आपल्या त्वचेची काळजी घेणे खूप गरजेचे असते. अशा काळामध्ये त्वचा कोरडी पडण्याचे प्रमाण खूपच वाढत असते थंडीच्या काळात अनेक लोकांच्या गाल ओठ पाय हे फुटत असतात व त्यांमधून रक्त बाहेर येत असते.

अशा काळामध्ये त्वचेला कोरडे पडू द्यायला नाही पाहिजे. यासाठी योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. त्वचे मध्ये ओलसरपणा कायमचा ठेवण्यासाठी पेट्रोलियम जेली चा उपयोग करायला हवा. तसेच आपले गाल खूपच कोरडे पडले असेल तर यावर व्हॅसलीन लावायला हवी.

जर तुम्हाला तुमच्या टाचांना चिरा किंवा भेगा पडण्यापासून वाचवायचे असेल तर थंडीच्या काळामध्ये पायांवर मोजे घालायला कधीही विसरू नका. पायांवर मोजे घातल्यास तुमच्या टाचा कधीही उलनार नाही.

रात्री झोपताना आपल्या पायांच्या तळव्यांना पघळून मेन लावावे आणि सकाळी आपल्या तळव्यांना गरम पाण्याने धुऊन टाकावे. यामुळे काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. जर तुमच्या तळव्यांना भेगा पडल्या असतील तर या काही दिवसातच बऱ्या होऊन जातील.

अंघोळ झाल्यानंतर तळपायाची आग खूप होत असते अशावेळी तळपायांना थोडेसे तेल गरम करून लावावे. लक्षात ठेवा तुम्ही जे तेल पायांना लावणार आहात ते तेल नारळाचे किंवा मोहरीचे असायला हवे. यामुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

भेगा पडलेल्या तळपायांना ग्लिसरीन गुलाब जल चा उपयोग करावा. यामुळे तळपायाची त्वचा आणखी मऊ होत असते व त्वचेवर भेगा पडलेल्या असतील तर त्या देखील बऱ्या होत असतात.

Post a Comment

Previous Post Next Post