सोमवार: वास्तुनुसार जर तुम्ही सोमवारच्या दिवशी काही खास काम करणार असाल व त्यासाठी घरातून बाहेर पडत असाल तर घरातून बाहेर पडण्याआधी आरशामध्ये आपला चेहरा बघून बाहेर पडा. असे केल्यास तुम्हाला त्यादिवशी जे काम करायचे आहे त्यामध्ये नक्की यश मिळेल.

मंगळवार: जर तुम्हाला मंगळवारच्या दिवशी काही खास काम असेल व त्यासाठी तुम्ही घराच्या बाहेर पडत असाल तर अशावेळी घरातून बाहेर पडण्याआधी काहीतरी गोड खाऊन नक्की बाहेर पडा. तुम्ही थोडीशी साखर किंवा गुळ देखील खाऊ शकता.

बुधवार: जर बुधवारच्या दिवशी तुम्हाला काही विशेष काम असेल व त्यासाठी तुम्ही घराच्या बाहेर पडणार असाल तर अशावेळी कोथिंबीर चे पाने खाऊन बाहेर पडा. असे केल्यास तुम्हाला प्रत्येक कामामध्ये सफलता मिळेल.

गुरुवार: जर गुरूवारच्या दिवशी तुम्हाला काही खास काम असेल व कामानिमित्त तुम्ही घरातून जरा लवकरच बाहेर पडत असाल तर तेव्हा तुम्ही मोहरीचे काही दाणे तोंडात टाकून बाहेर पडा. यामुळे तुम्हाला कामामध्ये यश मिळेल.

शुक्रवार: शुक्रवारच्या दिवशी जर काही विशेष काम असेल तर अशावेळी तुम्ही घराच्या बाहेर पडण्या अगोदर दुधाने बनवलेले कोणतीही वस्तू खावी व त्यानंतर बाहेर पडावे.

शनिवार: जर तुम्ही शनिवारी एखाद्या विशेष कामासाठी बाहेर पडणार असाल तर अशा वेळी अद्रक किंवा दही खाऊन बाहेर पडावे, असे केल्यास तुमचे जे काम आहे ते सफल संपूर्ण होईल.

रविवार: जर रविवारच्या दिवशी तुम्ही काही कामासाठी बाहेर पडत असाल तर तुळशीचे पान खाऊन बाहेर पडा हे पान तुम्ही खिशामध्ये ठेवा यामुळे तुमचे काम नक्की यशस्वी होईल.

Post a Comment

Previous Post Next Post