वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी काही वस्तू चे नियम पालन करणे खूप गरजेचे असते. नाहीतर त्यामुळे घरामध्ये वास्तुदोष उत्पन्न होण्यामुळे आर्थिक रुपाने अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

अशातच घरामध्ये काही वस्तू ठेवल्यास तुम्हाला अशा प्रकारची समस्या उद्भवणार नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच काही वस्तू सांगणार आहोत ज्यांना तुम्ही घरांमध्ये ठेवल्यास घरामध्ये नेहमी सकारात्मकता निर्माण राहील. घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जेचा शिरकाव राहील.

घराच्या अग्नेय कोपऱ्यामध्ये म्हणजेच दक्षिण पूर्ण मध्ये तुळस आणि मनीप्लांट असायला हवे. या दिशेला देवता गणपतीचे आसन मानले जाते. अशातच या दिशेला हे रोपटे लावल्यास येथे देवतांचा वास निर्माण होत असतो.

बऱ्याच घरामध्ये वास्तुदोष निर्माण होत असतो. अशा वेळी आपल्या घरामध्ये वास्तुपुरुषाची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवून दररोज त्याच्यासमोर कापूर ची वात जाळण्यास सुरुवात करावी. यामुळे घरांमध्ये होणारा वास्तुदोष ठीक होत असतो व सुख-समृद्धी देखील नांदत असते.

ज्योतिष शास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व प्राप्त आहे. अशावेळी घराच्या मुख्य दरवाजावर कुंकू द्वारे स्वस्तिक बनवल्यास हे देखील खूपच शुभ मानले जाते. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा शिरकाव होत नाही व घरामध्ये सुरू असलेले भांडण किरकर यामुळे थांबत असते.

ज्या लोकांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा लोकांनी आपल्या घराच्या देवघरामध्ये माता लक्ष्मी सोबत भगवान कुबेराची मूर्ती व कुबेर यंत्र ठेवायला हवे. यामुळे धनाची कुठलीही समस्या कधीही उद्भवणार नाही व घरामध्ये नेहमी लक्ष्मी व कुबेराचा वास राहील.

Post a Comment

Previous Post Next Post