गेल्या काही दिवसापासून कंगना राणावत अनेक विवादांमध्ये राहिली आहे. कंगनावर अनेक प्रकारचे आरोप-प्रत्यारोप लावण्यात आलेले आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का की कंगना राणावत कडे किती संपत्ती आहे. कंगना राणावत च्या एका दिवसाची कमाई किती आहे हे जाणून घेतल्यानंतर तुम्ही देखील हैराण होऊन जाल.

कंगना राणावत बॉलीवूड मधील टॉप पेड एक्ट्रेस मध्ये आहे. ती एका चित्रपटा साठी चांगली मोठी रक्कम घेत असते. एवढेच नाही तर कंगना काही चित्रपट स्वतः देखील प्रोड्युस करु लागली आहे. एका रिपोर्टनुसार असे सांगितले जाते की कंगना राणावत एका चित्रपटासाठी अकरा करोड रुपये एवढे पैसे घेत असते.

कंगना कडे मणिकर्णिका आणि पंगा सारख्या चित्रपटानंतर अनेक जाहिरातींच्या ऑफर येऊ लागल्या. असे सांगितले जाते की प्रमोशनल शूटिंग साठी कंगना पर डे नुसार चार्ज करते. एका दिवसाच्या प्रमोशनल शूटिंगसाठी कंगना 1.5 करोड रुपये घेत असते.

कंगनाची संपूर्ण संपत्ती अजून पब्लिक समोर आलेली नाही. परंतु फोर्ब्स 2019 नुसार कंगनाने वर्षभरामध्ये 17.5 करोड रुपये कमावले आहेत. सर्वात जास्त कमाई करणाऱ्या शंभर सेलिब्रिटींच्या यादीमध्ये कंगना 70 व्या स्थानी आहे.

कंगनाला लैविश कार चा खूप शोक आहे. कंगनाकडे मर्सडीज सोबतच अनेक लक्झरी कार्स आहेत. कंगनाने आपल्या करिअरच्या सुरुवातीला 2006मध्ये चित्रपट गॅंगस्टर मधून सुरुवात केली होती. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. कंगनाने आतापर्यंत तीन नेशनल अवार्ड देखील मिळवलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post