मेष रास:

मेष राशीच्या जातकांना या गुरुवारपासून धन व पैसा कमावण्याच्या अनेक नव्या संधी प्राप्त होणार आहेत. त्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होताना दिसेल. जोडीदारासोबत आपले संबंध सुधारतील. वैवाहिक जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये मोठे यश व कीर्ति मिळेल. भागीदारी व्यवसाय करण्यास चांगला काळ आहे.

मिथुन रास:-

नोकरी व्यवसायाच्या माध्यमातून धनलाभ होणार आहेत. कौटुंबिक समस्या समस्यांचा सामना करावा लागु शकतो. जोडीदाराचा मूड खूप चांगला राहील. आपल्याला जीवनसाथीकडून आपल्यावर प्रेमाचा वर्षाव होईल आणि सुख मिळेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यशप्राप्ती होईल. पती-पत्नीतील प्रेमसंबंध वाढतील. आज आपल्याला देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे.

सिंह रास:-

आज आपल्याला नवी सुरुवात करावी लागेल. कठोर मेहनतीमुळे यश प्राप्त होणार आहे. दुसऱ्यांच्या भरोशावर बसू नका. कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेणे आपल्याला हितकारक ठरेल. इतरांकडुन मिळणार्‍या लाभाची अपेक्षा सोडून द्या, आपल्या क्षमता आजमावून यश मिळु शकते.

कन्या रास:-

नव्या कार्यासंबंधी अडचणी येऊ शकतात, तेव्हा आपण या आठवड्यामध्ये कोणत्याही नव्या कामाला सुरुवात करू नका. रागावर नियंत्रण ठेवा. पूर्ण माहिती असल्याशिवाय कुठेही आर्थिक गुंतवणूक करू नका.

तुळ रास:-

पैसे कमवण्यासाठी नवीन संधी चालून येतील. ऐतिहासिक इमारती पाहण्याचा आपल्याला योग येणार आहे. कुटुंबासोबत चांगले जेवण बनवण्याचा व मिष्ठान्न भोजनाचा योग येऊ शकतो. कामाची चिंता सतावेल. कुटुंबाची साथ लाभेल.

कुंभ रास:- धार्मिक कार्यामध्ये श्रद्धा वाढेल. गुप्तशत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवा. कौटुंबिक जीवनामध्ये आनंद व प्रेम मिळेल. कुटुंबासोबत वेळ घालवता येईल. रोजगाराच्या संधी चालून येतील. भागीदारीच्या व्यवसायामधून लाभ मिळेल. अचानक घरी पाहुणे येतील.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Post a Comment

Previous Post Next Post